पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रधान नावाचे कलेक्टर असताना झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची हकीकत सांगतो.' ठोंबरे चंद्रकांत व इनसायडरला सांगत होते. ठोंबरे म्हणाले, 'तेव्हा मी पुण्याला हेड ऑफिसला क्रीडा व युवक सेवा संचालनालयात सहायक संचालक होतो. एके दिवशी मला संचालकांनी बोलावून घेतलं.

 'त्यावेळी आमच्या क्रीडा खात्याचे संचालक लाटकरसाहेब होते. तो दिवस मला चांगलाच आठवतो. मी त्यांच्या दालनात गेलो, तेव्हा ते चांगलेच गंभीर दिसत होते. मला म्हणाले, ‘मराठवाड्यातले एक छत्रपती अवॉर्ड विजेते क्रीडा संघटक राज्याचे क्रीडामंत्री झाले म्हणून त्यांच्या ऑनरसाठी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमधील दोन खेळांचे आयोजन या शहरात केले होते. पण कलेक्टर प्रधानांचा मला फोन आला. ते माझ्यावर सख्त नाराज झाले होते. ते धमकीवजा स्वरात म्हणाले,

 'या जिल्ह्याचा मी कलेक्टर. मला न विचारता तुम्ही स्पर्धा माझ्या जिल्ह्यात आयोजित करता? मी पाहातोच त्या कशा नीट पार पडतात ते.'

 ठोंबरे चांगलेच गंभीर झाले होते. कारण या स्पर्धा व्हाव्यात म्हणून तेच आग्रही होते. स्पर्धेसाठी हे शहर उत्तम होते. मोठे सुसज्ज स्टेडियम आणि निवास व्यवस्थेची सोय होती.

 नव्यानं झालेले क्रीडामंत्री हे बऱ्याच वर्षापासून क्रीडा संघटक होते. मंत्री झाले म्हणून त्यांचा गौरव क्रीडा स्पर्धा घेऊन करावा ही कल्पना लाटकर साहेबांना आवडली. त्यांनी कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन खेळांचे यजमानपद महाराष्ट्राच्या वतीने स्वीकारले.

 पण कलेक्टर प्रधानांच्या अनपेक्षित विरोधाच्या पावित्र्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. स्पर्धेचे ठिकाण क्रीडामंत्री व संचालकांनी नांदेडला कलेक्टरांसोबत चर्चा करून जाहीर करावं असं ठोंबरेंनी सुचवलं होतं. पण लाटकरांनी उत्साहाच्या भरात क्रीडामंत्र्यांची संमती असल्यामुळे परस्पर जाहीर केलं. कलेक्टर प्रधानांना ते खटकलं असणार.

 लाटकरांनी ठोंबरेला हे कथन करीत म्हटलं, 'मी प्रधानांना खूप समजावयाचा प्रयत्न केला. पण ते ऐकायच्या मन:स्थितीत नाहीत. आता हा क्रीडा खात्याच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. तुम्ही पूर्वी तिथे काम केले आहे, तेव्हा स्पर्धा होईपर्यंत तिथे जिल्हा क्रीडा अधिकारी व उपसंचालक यांच्यासोबत राहून स्पर्धा पार पाडा. तुम्हाला मी फ्री हँड देतो. कलेक्टरविनाही आपण त्या स्पर्धा यशस्वी करून दाखवू.' ठोंबरे मग त्यांनी कशी स्पर्धा पार पाडली हे चंद्रकांतला सांगू लागले, 'सर, मी त्याच रात्री नांदेडला आलो. मागे राजे सरांनी महिला क्रीडा

प्रशासननामा । ८५