पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्या निकषाची नम्रपणे आठवण करून दिली. तेव्हा ते म्हणाले होते, ‘देअर आर सर्टन एक्सेप्शन्स टु दि रूल्स. आफ्टर ऑल ही इज ए डायरेक्ट आय. ए. एस.' हे आयुक्त फार न्यायी आणि समतोल म्हणून प्रसिद्ध होते. तरीही प्रसंग येताच चंद्रकांत ऐवजी थेट आय.ए.एस. ला त्यांनी झुकतं माप दिलं. वर पुन्हा त्यांचं धडधडीत चुकीचं समर्थनही केलं. यात आपण चुकत आहोत व न्याय - तर्कसंगत नाही, याचाही त्यांना त्यावेळी विसर पडलेला दिसत होता. प्रशासकीय चातुर्वर्ण्याचं हे बोलकं आणि विदारक उदाहरण आहे.

 या प्रशासकीय चातुर्वण्र्याची समाजाला जाणीव तरी आहे का? त्याविरुद्ध कुणी कसा आवाज त्या अभावी उठवणार? आणि त्या प्रशासकीय अन्यायाचे निराकरण तरी कसे होणार?

 टीप :- या लेखातला निवडणुकीचा संदर्भ हा १९९५ सालचा आहे. त्या वेळी आजच्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन (इ.व्ही.एम.) वापरले जात नव्हते. त्यावेळी छोट्या व मोठ्या आकाराचा मतपेट्या होत्या व कागदी मतपत्रिका वापरल्या जायच्या.

प्रशासननामा । ६७