पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संपण्याची तारीख जाहीर करून चंद्रकांतने झपाट्याने काम सुरू केले. आजवर कधी पाटीपेन्सिल हातात न घेतलेल्या निरक्षर प्रौढांत जसे झोपडपट्टीतील मजूर होते, सणाखेरीज पाटलाचा वाडा न ओलांडणाच्या घरंदाज स्त्रिया होत्या, तसेच बुरखा पांघरणाऱ्या व उर्दूमधून शिकण्याचा आग्रह धरणाऱ्या मुस्लीम महिलाही होत्या. त्या सर्वांना अक्षरांची गोडी लागली. त्या खास वर्गात तयार केलेली गीते दररोज म्हणत होत्या.

 ‘गावात झालं नवंच वारं, बाई मी अक्षरांची रांगोळी काढते.'

 शेतकरी बैलगाडीतून खाली उतरला की जशी बैलगाडी अचानक थांबते, तसं कलेक्टर संतोखसिंगच्या अचानक झालेल्या बदलीनं झालं. अभियान संपायला काही महिने बाकी होते. साक्षरोत्तर कार्यक्रमाचंही पुढील वर्षीचं नियोजन व्हायचं होतं. संतोखसिंगचा कालावधी पूर्ण झाला नव्हता. जेथे वर्गात प्रौढांची उपस्थिती कमी होती किंवा प्रतिसाद अल्प होता, तेथे संतोखसिंगांनी पदयात्राही काढल्या. त्यांची अचानक बदली धक्कादायक होती. जिल्ह्यातील शिक्षक, आमदारांनी पालकमंत्र्यांकडे रदबदली केली. पण खुद्द पालकमंत्र्यांना साक्षरता अभियान साफ नापसंत होतं. 'डंगरांना काय शिकवायचं? त्यापेक्षा पोरांना शिकवावं,' असं त्यांचं मत होतं. कलेक्टर या कामामध्ये जास्त रस घेतात म्हणून ते नाराज होते. संतोखसिंगांना अभियान पूर्ण होण्यापूर्वी जावं लागलं. नव्या कलेक्टरांना यात अजिबात रस नव्हता. त्यांची व पालकमंत्र्यांची याबाबतची मते आश्यर्चकारकरीत्या समान होती. त्यांनी सारं काम चंद्रकांतवर सोपवून दिलं. कारण केंद्राची योजना होती, ती त्यांना बंद करणं शक्य नव्हतं. नाहीतर त्यांनी तेही केलं असतं.

 नाउमेद न होता शिकस्तीनं अभियानाचा अंतिम टप्पा गाठण्याचा प्रयत्न चंद्रकांत करीत होता. त्याला तहसीलदार जाधव व शिक्षणाधिकारी यांची साथ होती. पण मध्येच जाधवची बदली झाली. तेव्हा त्याच्या निरोप समारंभात. चंद्रकांतनं ही सारी पार्श्वभूमी सांगून म्हटलं,

 ‘प्रशासनात सातत्य असावं, हे ब्रिटिश काळापासून चालत आलेलं महत्त्वाचं तत्त्व आज पार निकालात काढलं गेलं आहे. त्याला जसे अदूरदर्शी राज्यकर्ते कारणीभूत आहेत, तसेच आय. ए. एस. चे शेपूट न चुकता लावणारे अधिकारी पण आहेत. विधिमंडळाचे धोरण राबविण्याऐवजी आपला ‘पर्सनल अजेंडा' राबविण्यावर त्यांचा भर असतो. त्याचे काही तात्कालिक फायदे असतात. उदाहरणार्थ, भ्रष्टाचार न करणं व भ्रष्टाचाराचा मुकाबला करणं हा प्रत्येक शासकीय अधिका-याचा कर्तव्याचा एक भाग आहे. पण आज काहीजण केवळ

प्रशासननामा । ३७