पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ताबडतोब बदली करा असा हट्ट धरला आहे त्यानं.'

 'मी त्याबाबत काय सांगू सर? बदली करणं, न करणं हा तुमचा अधिकार आहे.'

 प्रयत्न केला तरी आपल्या आवाजातील निराशा चंद्रकांतला लपवता येत नव्हती. त्यानं स्वत:वर ताबा ठेवत शांतपणे घडलेली हकीकत सांगून पुढे म्हटलं,

 ‘मी परिस्थितीनुरूप कारवाई केली आहे. चॅप्टर केसेसमध्ये क्रॉस जामीनचे तत्त्व तुम्हीच आम्हाला प्रशिक्षणवर्गात सांगितले आहे. त्याचेच मी आणि तहसीलदारांनी पालन केले आहे. मुख्य म्हणजे एका कार्यकारी अभियंत्याला मारहाण करणाऱ्यांना कायद्याप्रमाणे अटक केली आहे एवढेच.'

 ‘ते सर्व खरं आहे; पण आता मला महसूलमंत्र्यांचा फोन येईल-त्याचे काय?'

 चंद्रकांत काही बोलला नाही. खूप काही बोलावंसं वाटत होतं; पण आयुक्तांना जास्त बोललेलं आवडत नाही. त्यानं त्यांच्या अधिकारात अधिक्षेप होतो, असं त्यांचं मत आहे. पुन्हा त्यांना मंत्र्यापुढे ठामपणे उभं राहता येत नाही. आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना संरक्षण देता येत नाही, हे चंद्रकांतला माहीत होतं.

 काही वेळानं त्याच्या दालनात आठ-दहा पत्रकार बातमीची कुणकुण लागल्यामुळे जमा झाले होते. आणि त्यांची अनौपचारिक अशी पत्रकार परिषद सुरू झाली.

 एव्हाना चंद्रकांतही मनोमन सावरला गेला होता. त्याला आपलं भवितव्य कळून चुकलं होतं. त्यामुळे तो पत्रकारांना म्हणाला, 'हे गाव काही माझी जहागीर नाही. बदली झाली तरी बेहत्तर!'

 ‘पण सर, ज्या कार्यकारी अभियंत्यासाठी तुम्ही आपलं पद पणाला लावलं आहे, त्यानं पोलीस चौकशीत त्यांना कुणी मारहाण केली हे माहीत नाही, असं म्हणत गुन्हेगाराला ओळखत नसल्याचा जबाब दिला. त्यामुळे तुमच्या तहसीलदाराचे आदेश परवा कोर्टात रद्द होणार!'

 चंद्रकांत अवाक् होऊन ती माहिती देणाच्या पत्रकाराकडे पाहातच राहिला.

  'हे असं का घडलं असेल, याचा मी अंदाज बांधू शकतो. त्याला जिवाचा भीती वाटली असेल हे एक कारण, आणि त्याहीपेक्षा आमदार उद्या आपली भ्रष्ट कारभाराची कुलंगडी काढतील, हे दुसरं कारण असणार. हा जिल्हा म्हणजे समद्ध जलसिंचनाचा जिल्हा. इथं इरिगेशन खात्यातली पोस्ट म्हणजे सोन्याची

२४ । प्रशासननामा