पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/177

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अधिकारी आहेत, ते अशा स्वंयभू पुढा-यांशी जुळवून घेतात. त्यांच्याविरुद्ध ते सहसा तक्रारी करत नाहीत. उलटपक्षी ते अपवादानं स्वच्छ असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध त्याचा वापर करतात. त्यांचे हितसंबंध सांभाळले जात नाहीत अशा प्रकरणात. त्यामुळे खोट्या तक्रारीचे तण माजले आहे. त्यामुळे प्रशासनात स्वच्छता यायला मदत होत नाही. उलटपक्षी चांगल्याचं खच्चीकरण होतं. ते नाऊमेद बनतात, सिनिक होतात. वाईट अधिकाऱ्यांना अभय व महत्त्वाची पदे मिळणं आणि चांगल्यांना नाऊमेद करीत खच्ची करणं हा प्रशासकीय खेळ देश व राज्याला महागात पडणार आहे."

 "नाही चंद्रकांत." अश्विनी म्हणाली, “ तुला, तुझ्यासारख्यांना नाऊमेद होऊन चालणार नाही. सोन्यालाच तप्त भट्टीतून आगीशी सामना करावा लागतो. त्यातूनच त्याचं तेज उजळतं!"

 "आणि वहिनी, दुसरंही एक सत्य आहे... सांच को आंच नाही!"

 इनसायडर चंद्रकांतच्या पाठीवर थाप मारीत म्हणाला, “म्हणून मित्रा! तुझ्या शब्दात तुलाच सांगतो, डू द बेस्ट अँड लीव्ह द रेस्ट टू दॅट फोर्स बियाँडवुईच वुई कॉल नेचर, डेस्टिनी ऑर ऑलमायटी गॉड...!"

१७६ । प्रशासननामा