पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वातावरणात वर्षभर मी स्वतः प्रशासनाच्या स्मरणयात्रेत रममाण होत पुन:प्रत्ययाचा रोमांचक अनुभव सजगतेनं लुटला आणि वाचकही या सफरनाम्यात रंगून गेले.

 ‘प्रशासननामा' ही माझी लेखमाला नाही, तर 'कथा-लेख माला' आहे, असे मला वाटते. यातील प्रत्येक कथालेख म्हणजे तीन चतुर्थांश कथा ललितरूपाने आलेली आहे, तर एक चतुर्थांश भाग हा प्रशासनाच्या एका पैलूवरचे चिंतन मांडणारा लेख आहे. म्हणून हे कथालेख आहेत. जसा मी माझा २००४ साली प्रसिद्ध झालेल्या व आंतरराष्ट्रीय दहशतवादाची प्रयोगशाळा बनलेल्या अफगाणिस्तान नामक देशाच्या वाताहतीची कादंबरी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ('राजहंस प्रकाशन') लिहिताना 'फॅक्शन' हो fact and fiction चे मिश्रण असलेला, मराठीत अपवादानं आलेला, फॉर्म लेखनासाठी वापरला होता, तसाच ‘प्रशासननामा' कथेचे लालित्य व लेखामधील विचार व चिंतनाचं मिश्रण करून साकार झाला आहे. माझ्या परीने एक नवा लेखनफॉर्म मी धुंडाळायची प्रयत्न केला आहे. त्याचीही वाचक व खास करून समीक्षक नोंद घेतील अशी अपेक्षा आहे.

 प्रशासन ही माझा जेवढा पोटापाण्याचा म्हणजे व्यवसायाचा व नोकरीपेशाचा भाग आहे, त्याहीपेक्षा तो अधिक माझ्या आनंदाचा, झोकून देत काम करताना उपभोगायच्या आनंदाचा भाग आहे. मी स्वत:ला 'पगारी समाजसवेक' (Paid Social Worker) समजतो. स्वयंसेवी संस्थांत काम करणा-यांना N.G.O. कार्यकर्ते (Non Governmental Social Worker) असं संबोधलं जातं. प्रशासनात मिशनरी वृत्तीनं काम करणाऱ्याला Ad.G.O. कार्यकर्ते (Adminirtrative developmental Governmental Organization Social Worker) का म्हटले जाऊ नये, हा माझा सवाल आहे. या प्रशासननामातील ‘प्रिय सर' व 'वारकरी माऊली' हे दोन लेख म्हणजे प्रशासनातील दोन आदर्शवत अधिका-यांचे Ad.G.O. कार्यकर्ते या स्वरूपातले दर्शन आहे. पुन्हा, या पुस्तकातील किमान निम्म्या लेखात कलेक्टर पण याच जातकुळीचे आहेत.

 पण मला हेही मान्य केले पाहिजेच की, प्रशासनात नीरक्षीर विवेकानं काम करणारे सक्षम अधिकारी व मिशनरी वृत्तीने वागणारे

सोळा