पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
ना तरी आयुष्य पुरले आहे ।
तरी औषधे काही नोहे ।
येथ एकाची उपेगा जाये ।
परमामृत
यथा बोला संजयो म्हणे ।
जी येरयेरांची मी नेणे ।
परि आयुष्य तेथे जिणे ।
पुढे की गा

 मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिलो. असाही अवलिया, चुकून का होईना, प्रशासनात सापडतो, हे प्रशासनाचे अहोभाग्य म्हटलं पाहिजे!

 “सर, माऊलींच्या अशा ओव्यातून माझी जडणघडण झाली. मृत्यू हा मानवी जीवनाचा महासखा आहे, खरं तर मृत्यू हे जीवनाचे एकमेव अंतिम सत्य आहे. पर्यायाने लौकिक जीवन क्षणभंगुर आहे, तर मग माणसं लोभी का होतात ? भ्रष्टाचार का करतात? वामाचार का करतात? हा मला नेहमी प्रश्न पडतो."

 मित्रा! आपल्या महसूल प्रशासनात माणूस जन्माला येण्याच्या आधीपासून आणि मरून गेल्यानंतरही त्याच्याशी संबंधित अनेकविध कामे करावी लागतात. त्यातील सर्वात अवघड काम म्हणजे महसूल वसुली, विविध करांची वसुली, साम-दाम-दंड-भेदाने करावी लागते. राजकीय हस्तक्षेपाला तू या कसोटीला शंभर टक्के उतरला आहेस. तुझे वसुलीचे तंत्र सर्वांना उलगडून दाखवले, तरी ते केवळ तुलाच जमू शकेल! याचा पॅटर्न होणे शक्य नाही.

 एका तलाठ्यानं तुझ्या वसुलीची पद्धत मला एका भेटीत सांगितली. त्याच्याकडे पाच गावे होती. अनेक गावकरी बागायती शेती करणारे असूनही वसुली देत नव्हते. आपल्या परीने प्रयत्न करूनही तलाठ्याला यश मिळत नव्हते. कारण तिथला एक सरपंच आमदाराचा प्रमुख कार्यकर्ता होता आणि त्याच्या जोरावर तो सरपंच स्वत:ची थकबाकी द्यायचा नाही. शिवाय गावक-यांनाही ‘पैसे भरू नका.' अशी फूस द्यायचा. त्या गावी वसुली दौऱ्याच्या काळात तू गेलास तेव्हा गावात भागवत सप्ताह चालू आहे, असं तुला समजलं. अशावेळी माझ्यासारखा अधिकारी सरळ ते गाव टाळून पुढे गेला असता. पण तू वारकरी, तू पाराजवळ जीप थांबवलीस. वीणा वाजवीत भजन-कीर्तने करणाऱ्या बुवांच्या पाया पडून खाली जमिनीवर बसलास. श्रवणात मग्न झालास. गावकऱ्यांनी तुला

प्रशासननामा । १६१