पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घेतलेली माहिती यांच्या आधारे घडलेला वृत्तांत थोडक्यात कथन केला.

 बाबरी मस्जीद पडली त्यादिवशी दुपारी साडेबारा वाजता चंद्रकांतला एस.टी.डी.वरून एक फोन आला. तो सबइनस्पेक्टर जोशी यांचा. तो फैजाबाद, उत्तरप्रदेशावरून होता. अयोध्येला महाराष्ट्रातून गेलेल्या रामभक्तांवर नजर ठेवण्यासाठी राज्यशासनाने त्यांना पाठवले होते. त्यांनी दिलेली बातमी धक्कादायक होती.

 “सर, येथे रामभक्तांनी बाबरी मशिदीचा विध्वंस सुरू केला आहे. तीनपैकी एक घुमट नुकताच जमीनदोस्त झाला आहे. आणि पोलीस व लष्कर बघ्याच्या भूमिकेत आहेत. हीच स्थिती राहिली तर संध्याकाळपर्यंत पूर्ण बाबरी मशिदीचा ढाचा आडवा होईल. मोठ्या मुश्किलीने एका खाजगी बूथवरून बोलतोय. तुम्ही प्लीज एस.पी.ना व राज्य पोलिसांना कल्पना द्या. उद्या ही वार्ता पोचली की दंगल भडकण्याची शक्यता आहे. आपला मराठवाडा हा मुस्लीमबहुल असल्यामुळे मी मुद्दाम कळवले आहे."

 'थँक यू, जोशी. तुम्ही खरंच समयसूचकता दाखवली आहे. किमान आपला जिल्हा तरी शांत राहील."

 चंद्रकांतने कलेक्टरांना ही खबर दिली. त्यांना क्षणभर खरे वाटले नाही. पण जोशी हे कर्तव्यनिष्ठ व नावाजलेले पोलीस निरीक्षक होते. त्यामुळे ही वार्ता खरी समजून पुढील कार्यवाही करण्याचे ठरले.

 “सर, सर्वप्रथम आपण केबल टि.व्ही. बंद करू या दोन दिवस, कारण बाबरी मशीद पडल्याचे दृश्य पुन्हा पुन्हा दाखवले जाईल व ते पाहून मुस्लिमांची मने प्रक्षुब्ध होतील!”

 “आणि १४४ कलम लावण्याची ऑर्डर ताबडतोब काढ." कलेक्टरांनी आदेश दिले. “एस.पीं.शी बोलून मी रात्रीचा कर्फ्यू लावतो. सर्व प्रकारच्या प्रोसेशनवर बंदी घाला. सर्व तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना सूचना द्या."

 चंद्रकातने वेळीच पावले उचलली. जिल्हा कालपरवा दोन्ही दिवस शांत राहिला. तुरळक दगडफेक वा चाकूमारीचे प्रसंग सोडले तर सर्वसाधारण परिस्थिती नियंत्रणात होती.

 आणि आज तिसऱ्या दिवशी एका तालुक्यात दंगल उसळली हेती. गोळीबार झाला. दोघे मरण पावले. पाच जण जखमी झाले होते.

 कलेक्टर व एस.पी.यांच्यासह तो तालुक्याला पोचला तेव्हा विश्रामगृहावर तहसीलदार कवडे स्वागताला हजर होते. ते अत्यंत तणावाखाली वाटत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीला अवधी दोन वर्षे उरली होती. कारकुनापासून चढत ते

प्रशासननामा । १५३