पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



एका दंगलीमागची कहाणी



 “सर, इथे तालुका मुख्यालयात दंगल पेटली आहे. बाबरी मस्जीद पाडल्याच्या निषेधार्थ मुस्लिमांनी मोर्चा काढला होता. मघाशी अकरा वाजता त्यांनी अचानक हिंसक होत जाळपोळ सुरू केली. तेव्हा पोलिसांना गोळीबार करून दंगल आटोक्यात आणण्याचे मी आदेश दिले. फायरिंगमध्ये दोन मरण पावले व पाच जखमी..."

 पलीकडे फोनवर कवडे उत्तेजित पण कापऱ्या स्वरात बोलत होते आणि निवासी उपजिल्हाधिकारी (आर.डी.सी) चंद्रकांत अवाक होऊन ऐकत होता.

 “आता परिस्थिती कशी आहे?" चंद्रकांतने विचारले.

 "टेन्स, बट अंडर कन्ट्रोल." टिपिकल ब्युरोक्रेटिक उत्तर.

 "तुम्ही मोर्चाला परवानगी मुळात का दिली रावसाहेब?" चंद्रकांतने काहीशा रोषाने विचारले, “एक औरंगाबद शहर वगळले तर सारा मराठवाडा शांत आहे. आपला जिल्हाही. पण आज तुमच्या तालुक्यातील दंगलीने गालबोट लावले. व्हाय डिड यू गिव्ह परमिशन फॉर प्रोसेशन ?"

 "सर, माझं जजमेंट थोडं चुकलं. पण..."

 क्षणभर थांबून कवडे म्हणाले, “प्लीज, कलेक्टरसाहेबांना आपण सूचित करा. माझी सांगायची हिंमत नाही. आणि दुपारी चार वाजता शांतता कमिटीची बैठक ठेवली आहे, तुम्ही, डी.एम. (कलेक्टर) व एस.पी.साहेब आलात तर वातावरण झपाट्याने निवळायला मदत होईल."

 "ठीक आहे. तुमचे प्रांत कुठे आहेत?"

 “ते इथे यायला निघाले आहेत. लवकरच पोचतील."

 “ओ.के., परिस्थितीवर नीट लक्ष ठेवा व कंट्रोल करा."

 चंद्रकांत कलेक्टरांच्या चेंबरमध्ये गेला. तिथे पोलीस अधीक्षकही होते.

 "मी तुलाच बोलावणार होतो, चंद्रकांत. काय खबर आहे?

 त्याने कवडेशी दूरवध्वनीवरून झालेले संभाषण व होम डी.वाय.एस.पी.कडून

१५२ । प्रशासननामा