पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/151

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 चंद्रकांत चूप होता. त्याच्या कानावर कलेक्टरांबाबत बरेच काही विविध माध्यमातून यायचे, आज त्याचा रोकडा पुरावा मिळाला होता. अन्यथा एवढा विचित्र निकाल आय.ए.एस.श्रेणीतील अधिका-यानं दिलाच नसता.

 सुमारे दीड वर्षांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं कलेक्टरांचा निकाल रद्द करून, भाऊचं बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र वैध ठरवलं होतं. आणि त्यांनी निकालपत्रात चंद्रकांतच्या चौकशी अहवालाचा आधार घेतला होता व त्यानं त्यात दिलेले ज्ञानकोशाचे संदर्भ व बेडाजंगम जातीचे देव, देवस्की व परंपरेचे दाखले ग्राह्य मानले होते. तेव्हा कलेक्टरही बदलून गेले होते व चंद्रकांतही. तरी भाऊ त्याला भेटायला आला होता. तेव्हा तो बोलला, ते त्याला सुन्न करून गेलं होतं.

 “सर, न्यायशास्त्रात एक म्हण आहे, 'जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड.' मी त्याचा या प्रकरणात पुरता अनुभव घेतला आहे. आता पुन्हा इतर मागासवर्ग जातीला रोटेशननं नगराध्यक्षपद येईल, ते ८-१० वर्षांनी. मी तेव्हा राजकारणात असेन याचा काय भरवसा ? आजची संधी गेली याची खंत आहे, पदासाठी असे नाही पण शहरासाठी फारसं काही क्षमता असूनही करता आलं नाही याची! पंधरा वर्षे नगरसेवक म्हणून नागरी समस्येचा अभ्यास केला, पण तो नगराध्यक्षपदाच्या रूपाने, सोडवायचा अधिकार जेव्हा प्राप्त झाला तो मला पुरेसा लाभलाच नाही, ही माझी दुहेरी खंत आहे."

 नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते. त्यावेळी भाऊनं आपण या निवडणुकीत उभं राहणार नाही असे जाहीर करून राजकीय जीवनातून निवृत्त होण्याचे जाहीर केलं.

 दुसऱ्या जिल्ह्यात बदलून गेलेल्या चंद्रकांच्या वाचनात ही बातमी आली आणि त्याला उदासीनतेमुळे भरून आलं. त्यातून बाहेर येण्याचा एक हुकमी मार्ग होता इनसायडरशी बातचीत.

 “मित्रा, भाऊ प्रकरणातून दोन-तीन बाबी प्रकर्षाने जाणवतात, त्या खचितच निरोगी राजकारण व आदर्श प्रशासनासाठी योग्य नाहीत. भाऊंच्या पक्षांतर्गत काही नगरसेवकांनी व त्या बड्या वजनदार नेत्यांनी त्यांची राजकीय कारकिर्द अतिशय घाणेरडे राजकारण खेळून संपविली. तुलनेने इतरांपेक्षा चांगला असणारा माणूस या शहराला नगराध्यक्ष म्हणून आणखी काही काळ लाभला असता तर काही विकासाची कामे निश्चितच मार्गी लागली असती. पण 'कुऱ्हाडीचा दांडा गोताळ काळ' प्रमाणे त्याचीच माणसे त्याच्या आड आली.

 "तरीही त्यांचा डाव सफल झाला नसता, जर मी निकाल दिला असता

१५० । प्रशासननामा