पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



ललाटीचा आलेख बदलणारे तलाठी



 रविवारी संध्याकाळी, शासकीय बंगल्यासमोरच्या तजेलदार हिरवळीवर खालीच बसून, चंद्रकांत पत्नी व मुलांशी गप्पा मारीत होता. समोर रविवारच्या पेपर्सच्या पुरवण्या पडल्या होत्या, त्या तो चाळत होता. त्याच्या पत्नीनं त्याच्या आवडीचा गरम भजी, मसाला पापड व चहाचा बेत केला होता. त्याचा तो मनापासून आस्वाद घेत होता.

 आणि त्याच वेळी बंगल्याच्या गेटमधून एक लाल दिव्याची जीप आली. नोकरानं निरोप दिला की, प्रांतसाहेब व जिल्हा पुरवठा अधिकारी आले आहेत. तसेच प्रांतसाहेबांच्या मुख्यालयीन तालुक्याचे तहसीलदार सोबत आहेत. सुटीच्या दिवशी कल्पना न देता तीन वरिष्ठ अधिकारी येतात, म्हणजे काही महत्त्वाचं काम असणार, हे चंद्रकांतनं ताडलं. तो उठून आपल्या अभ्यासिकेत आला. तिथं हे तीन अधिकारी नुकतेच येऊन विसावले होते.

 ‘बोला प्रांतसाहेब, काही विशेष?' चंद्रकांतनं विचारलं.

 'तसं विशेष आहे म्हणून तर...' चंद्रकातला दोन-तीन वर्ष ज्युनिअर असलेला प्रांत अधिकारी जरा घुटमळत म्हणाला.

 पण सेवानिवृत्ती जवळ आलेले अनुभवी जिल्हा पुरवठा अधिकारी पुढे होत म्हणाले, 'सर, मीच स्पष्ट बोलतो. आपण तिघांनी त्या तलाठ्याच्या गैरप्रकाराची जी चौकशी केली आहे, त्याबाबत एक विनंती घेऊन आम्ही तिघे आलो आहोत.'

 'माझा काही दोष नसताना आपण माझ्याविरुद्ध आयुक्तांकडे अहवाल पाठविला आहे, काही हरकत नाही सर.'

 आता सफारीतल्या काळ्याभिन्न, धिप्पाड, पूर्ण टक्कल असलेल्या तहसीलदारांना कंठ फुटला होता.

 “मी तालुक्यात गेली दोन वर्षे काम करतो आहे, त्या तलाठ्याला मी चांगला ओळखतो. त्याच्याबाबत चौकशीअंती आपण जो अहवाल तयार केला आहे, त्यावर निमूटपणे प्रांतसाहेब व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सह्या

प्रशासननामा । १३१