पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुढाकार घेतला पाहिजे. सामाजिक प्रबोधन आणि बहिष्कार या दुहेरी मार्गाने कार्यकर्ते, प्रशासन आणि लोकनेते यांनी मिळून काम केलं, तरच अत्याचाराला बळी पडणाच्या मायभगिनींना न्याय देऊ शकू."

 हा प्रसंग इनसायडरला सांगताना चंद्रकांत म्हणाला, “मित्रा, प्रशासनात या कलेक्टरांसारखे सामाजिक विचार करणारे व त्यासाठी अधिकार वापरणारे प्रशासक वाढले तर स्त्री-अत्याचार निर्मूलन चळवळीत. गुणात्मक फरक पडू शकतो, हे नक्की! पण आम्ही हाती एकवटलेले अधिकार व त्याच्या वापरातून उपभोगाच्या जीवनशैलीत रममाण झालेले बहुसंख्य अधिकारी आहेत. जो समाज आपल्या करातून आमचं पगारपाणी करतो, त्या समाजाचं आपण काही देणं लागतो याचा गांभीर्याने विचार आम्ही अधिकारीवर्ग, केव्हा करणार? हा सवाल आजच्या घडीचा आहे. त्याचं उत्तर, दुर्दैवाने, आज तरी होकारार्थी देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे."

प्रशासननामा । १२५