पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहणी करून त्यांना खावटीची मदत वाटायची होती व तीही पाच दिवसात. कारण सहाव्या दिवशी जिल्हा मुख्यालयी पुनर्वसन मंत्री त्यांचा आढावा घेणार होते.

 चंद्रकांतला ज्या तालुक्याचे काम दिले होते. तिथे अजूनही अनेक गावात रस्ते-पूल वाहून गेल्यामुळे जीप गाडीने जाणे शक्य नव्हते. तरीही पाच दिवसात बत्तीस गावांना मदत वाटप निर्दोष रीतीनं करायचं त्यांना मनोमन ठरवलं.

 या बत्तीस गावांसाठी त्यानं तीन-तीन कर्मचाऱ्यांच्या अकरा तुकड्या केल्या. त्यात एक तलाठी, एक ग्रामसेवक व तहसीलचा अव्वल कारकून किंवा नायब तहसीलदार असे तिघे होते. त्यांनी रोज एकेका गावात जाऊन काम करायचं होतं.

 “पण सर, मदत वाटपाची प्रोसीजर पाहता तीन दिवसात फारतर सर्वेक्षण होईल व पंचनामा करता येईल. पुन्हा तहसीलला येऊन याद्या तयार करणं, तहसीलदारांची मंजुरी घेणं व पैसे वाटप करणं या कामाला आणखी सहा ते आठ दिवस, तातडीने काम केली तरी लागू शकतात." एका मध्यमवयीन नायब तहसीलदारांनी अडचणी सांगत शंका उपस्थित केली.

 "असे असताना केवळ तीन दिवसात हे काम पूर्ण होणं कसं शक्य आहे?"

 साऱ्या कर्मचाऱ्यांनी माना डोलवित त्याला दुजोरा दिला होता. किंचित हसून चंद्रकांत म्हणाला, “मला मदतवाटपाची ही प्रक्रिया माहीत आहे व त्यासाठी तीन दिवसांचा वेळ अपुरा आहे, हेही मान्य आहे, पण एक कोटेशन सांगतो, जे भारतीय आयुर्विम्याच्या सर्व कार्यालयात पाहायला मिळतं. 'साधारण काम तो सभी करते है, काम असाधारण है इसिलिए करने योग्य है' त्यानुसार आपण काम करायचे आहे. ती तुम्हाला मार्ग व उपाय सांगतो. मात्र तुमच्याकडून मला एक वचन हवंय!"

 सारे कर्मचारी कान टवकारून ऐकत होते!

 “या अभूतपूर्व पुरामुळे अनेक गावात लोकांना त्याचा जबर फटका बसला आहे. हे मी तुम्हाला पुन्हा सांगायची गरज नाही. आणि त्यांना तातडीने मदत केली नाही तर त्यांचे हाल होतील. काहींची उपासमार होईल. अशा वेळी आपलं कर्तव्य आहे, त्यांना जलद गतीनं मदत करणे व त्यात कसलाही गैरप्रकार व भ्रष्टाचार न करणं. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, म्हणून एक नवा मार्ग आपण चोखाळायचा आहे, पण त्यासाठी तुम्ही मला वचन द्या की, एकही टीम कितीही दडपण आलं तरी खोटा पंचनामा करणार नाही. मदत जादा मिळावी म्हणून घरातील माणसांची संख्या वाढवून देणार नाही आणि वाटपात एका

प्रशासननामा । १०७