पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील सण, समारंभ, रीतीरिवाज, रूढी, परंपरा, यांचं जे वर्णन केले आहे, ते वाचत असताना त्यामागचं भावविश्व आपलंच असल्याची येणारी प्रचिती या निबंधांचं मोठं यश होय.
 जागतिकीकरणाचा परिणाम जीवनाच्या सर्वच क्षेत्रात झाला आहे. पण सर्वाधिक कठोर प्रहार जर त्यानं कशावर केला असेल तर मनुष्य संबंधांवर. संपर्क साधनांमुळे जगात अंतर नावाची कल्पनाच संपुष्टात । आली. जगण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत माणूस गतिशील यंत्र बनला. माणसाची पद-प्रतिष्ठा पैशावर जोखली जाऊ लागली. मनुष्य संबंधांची जागा । अर्थसंबंधांनी घेतली. या सर्वांचा परिणाम रोजच्या जीवनावर होणे स्वाभाविक होते. त्यामुळे होळी तर झाली'सारख्या वाक्यात भरलेला आशय काळाबरोबर वाहून गेला. दसरा, दिवाळी व होळी हे तीन सण म्हणजे तीन मोठे उत्सव असायचे. सणात जात, धर्म, पंथ भेद नव्हता. तीन दिवस चालणारी होळी असो अथवा विवाह दिवसातल्या तिस-या प्रहरी संपतं. चटावरचं श्राद्ध उरकण्याचं स्वरूप आलेले सण, समारंभ मनुष्य संबंध व संस्कृतीचे भग्नावशेष झालेत. होळीत टोपी उडवणे, लाकडं चोरणे, वर्गणी गोळा करणे (खरं तर वसूल करणे!) या सर्वांची असणारी रंगत हरवल्याचं लेखकाचं दुःख इतिहासजमा संस्कृतीचं आहे खरं तर! धुळवडीतलं रांगडेपण गमावून आपण नदीकाठी निराळे राहणारे सभ्य... आपण जीवनातल्या रंगछटा । गमावून सारं जीवन सफेदीचं. एकरंगी, सपाट करतो आहोत याचं भानच

आपणास उरलं नाही. बाजार गेला नि मॉल्स, शॉपी कल्चर आलं. त्यात माल, वजन, काटा, दो-या, दगड, पोती, कागद, पुडी, चुरा, भुसा सारं गमावून आपण चकचकीत, गुळगुळीत कागदातील हवाबंद वस्तू झालो आहोत. दारबंद, विचारबंद, असंबंध स्थितीत आपण जेरबंद झालो आहोत. लग्नपत्रिका इंग्रजीत छापणं... आपली भाषा गमावणं म्हणजे आपलं अस्तित्व गमावणं नि अस्मिता अव्हेरणं आहे हे आपणास केव्हा समजणार? ‘वरातीमागून घोडे' अशी आपली स्थिती होणार. पण तोवर सर्वस्व संपलेलं असणार. घड्याळाची टिकटिक जपायची तर वेळीच किल्ली द्यायला हवी. वेळीच वंगण घातलं तर चक्र फिरत राहणार. काळाची पण एक गुरूकिल्ली असते... सावध ऐका पुढल्या हाका'... त्या ऐकल्या नाही तर पश्चात्ताप ठरलेला... पश्चात्तापही वेळीच करावा लागतो... गोफण जशी वेळीच चालवावी लागते तसा पश्चात्ताप! व-हाड, वरात, व्याही, अहेर, नमस्कार, भाजी, भाकरी, भटजी सर्वच नाही का आपण गमावलं? ते हरियाणातच नाही... महाराष्ट्रातही व खाली केरळातही तेच! काँक्रिटच्या लांब रुंद

प्रशस्ती/९६