पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परसाईंचे 'नॉट पॅड'मधील निबंध नि कथा वाचून झाल्या... आपण हसलो नि विसरलो... असं होत नाही. परसाईंचे लेखन वाचकास हसवत-हसवत अंतर्मुख करतं. विचार करायला भाग पाडतं. विसंगती, विषमतेचं भान देतं. ते नष्ट करण्यास प्रवृत्त करतं. कोटीच्या श्रेणीतलं विनोदी लेखन साबणाचे फुगे, बुडबुडे असतात. त्यात व्यापकतेचा भ्रम असतो नि अस्तित्वाचा फोलपणाही! उलटपक्षी व्यंग वस्तुनिष्ठ सर्जन असतं.

 अलीकडच्या काळात मराठी विनोदावर गंभीरपणे व खोलवर विचार करणारा एक ग्रंथ डॉ. गो. मा. पवार यांनी लिहिला आहे. ‘विनोद : तत्त्व आणि स्वरूप त्यात त्यांनी विनोदाची तत्त्वे व त्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे. त्या विवेचनात मराठी साहित्यातील विनोदाची अनेक उदाहरणे दिली आहेत. ती वाचली तरी मराठी व हिंदी विनोदाची प्रकृती स्पष्ट होते. फरकही लक्षात येतो. यात कोणती भाषा श्रेष्ठ, कनिष्ठ असा भाव नाही. त्यातून प्रवृत्ती व प्रकृतीचा फरक अधोरेखित होतो हे मात्र खरे.
 हरिशंकर परसाई एक विनोदी लेखक म्हणून समजून घ्यायचे तर त्यांचं समग्र साहित्य वाचायला हवं. त्यांनी ९ कथासंग्रह, ३ कादंब-या, ९ निबंध संग्रह, २ व्यंग लेख संग्रह, ४ स्तंभ लेख संग्रह, १ शब्दचित्र संग्रह, १ आठवण संग्रह, आत्मचरित्र, संपादन, संकीर्ण असं विपुल व वैविध्यपूर्ण लेखन केलं आहे. 'नॉट पेड' वाचल्यावर मराठी वाचकांच्या मनात समग्र परसाई साहित्य मराठीत अनुवादित व्हावं अशी इच्छा निर्माण होईल अशी आशा आहे. ती तशी निर्माण झाली तर त्यांचं श्रेय अनुवादिका उज्ज्वला केळकर यांना द्यावं लागेल. त्यांनी 'नॉट पेड'चा अनुवाद मनःपूर्वक केला आहे. तो प्रयत्नपूर्वक केल्याच्या अनेक खुणा या अनुवादात आढळतात. विनोदाच्या जशा अनेक परी तशा अनुवादाच्याही. हिंदीतील अनेक रचनांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत. एकाच हिंदी कृतीचे अनेक मराठी अनुवादही

आढळतात. या संदर्भात हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला' या काव्याचं उदाहरण चपखलपणे लक्षात येतं. या रचनेचे मराठीत पाच अनुवाद झाले असून ते अनुक्रमे सर्वश्री डॉ. तारा भवाळकर, शं. पा. जोशी, विजयकुमार चोकसी, नानासाहेब चौधरी व जहीर शेख यांनी केले आहेत. पैकी पहिले तीन तर एकाच वर्षी म्हणजे १९८३ मध्ये चौधरींचा गतवर्षी ‘ग्रंथाली'तर्फे तर जहीर शेखांचा याचवर्षी प्रकाशित झाला आहे.
  हरिशंकर परसाईंचं उपरोक्त वैविध्यपूर्ण लेखन वाचन असताना लक्षात येतं की विनोद, व्यंग, उपहास, कोटी या विनोदाच्या परी त्यांत सर्वत्र आढळतात. त्यात सामाजिक विसंगतीचं वैविध्य दिसून येतं. त्यामुळे

प्रशस्ती/८४