पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/58

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रशस्ती (Prashasti).pdf

अधांतरी (आत्मकथन)

प्रा. प्रभावती मुठाळ

सुगावा प्रकाशन, पुणे

प्रकाशन - ऑगस्ट, २००९

पृष्ठे - २८0 किंमत - २५0/-ख-या अर्थाने धर्मबुद्धीवर आधारित सामाजिक न्याय कोणता?


 शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया आता कायद्याच्या दृष्टीने दलित नाहीत. जोतिबा फुल्यांनी आमच्या आत्मजाणिवा जाग्या केल्या आहेत. या आत्मजाणिवा जाग्या झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला वैधानिक अधिष्ठान दिले. घटनेने आमचे दलितत्व संपवले. आम्हाला हक्क आणि अधिकार दिले. आम्हाला समान मताधिकार व राजकीय दर्जा प्राप्त झाला. आमच्यावरचे अन्याय समजायला आम्हाला अकल आहे. त्यामुळे आमच्यावरचे अन्याय आम्ही निमूटपणे गिळत नाही. आमच्यावरचे अन्याय ओरडून सांगायला आम्हाला शब्द आहेत. आम्हाला राजकीय अधिकार आहेत. आम्ही ‘वोट बँक' आहोत. लोकशाहीतील मतांच्या राजकारणाने आणि आमच्या अक्कलेने व शब्दशक्तीने शासनाला आमची दखल घ्यावीच लागते. पण नवजात अनाथ आणि स्त्री (कुमारी माता)... दोन्ही अदृश्य दलित... बिचारी मरतात किंवा आमचे अनाथाश्रम भरतात. हे अनुभवकथन व्यक्त करणारे प्रा. प्रभावती मुठाळ यांचे ‘अधांतरी' हे। अनुभवकथन वाचकांत एक नवी सामाजिक न्यायबुद्धी जागवेल असा मला विश्वास आहे.

प्रशस्ती/५७