पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/4

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘प्रशस्तीच्या निमित्ताने...


 लेखनाच्या प्रवासात आपणास कधी एखाद्या पुस्तकास प्रस्तावना लिहावी लागेल असे मनात पूर्वी केव्हाही आल्याचं आठवत नाही. सन १९८८ साली माझे विद्यार्थी, सहकारी असलेले प्रा. डॉ. बाबासाहेब पोवार आपल्या एकांकिकांचा संग्रह घेऊन आले नि दोन शब्द प्रस्तावनापर लिहा म्हणून आग्रह करते झाले. त्यांनी असं करण्यामागे लेखन, वाचन, व्याख्यान, अध्यापनसंबंधी माझी काहीएक पाश्र्वभूमी होती. मी बी.ए., एम.ए. च्या वर्गांना हिंदी शिकवत असताना नाटक शिकवत असे. नंतर मी शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचा स्वीकृत सदस्य असतानाच्या काळात शंकर शेष हे नाटककार ‘विशेष लेखक' म्हणून निवडून त्यांची ‘फंदी' नि ‘खजुराहो का शिल्पी' ही दोन नाटके पाठ्यपुस्तक म्हणून अभ्यासक्रमात समाविष्ट केली होती नि ती मी शिकवितही होतो. शंकर शेष यांच्या जीवन आणि साहित्यावर तोवर हिंदीत अवाक्ष ही लिहिले गेले नव्हते. प्रायश्चित्त म्हणून प्राध्यापकांच्या गहजबानंतर मी ‘नाटककार शंकर शेष' हे पुस्तक लिहिले होते. (१९८३) ते माझे पहिले पुस्तक. त्या पुस्तकाने मला लौकिकार्थाने लेखक केले होते. नाटक चळवळीशी माझा संबंध प्रेक्षक म्हणून सुरू झालेला. तो दिग्दर्शन, समीक्षक, संशोधक, अभ्यासक म्हणून विस्तारेल असे कधी वाटले नव्हते. प्रा. बाबासाहेब पवार यांनी आपल्या ‘सुगंधी काटे' या एकांकी संग्रहास प्रस्तावना मागण्यामागे हा इतिहास होता. त्या प्रस्तावना लेखनाने मी लेखकाचा प्रस्तावनाकार झालो. त्या घटनेलाही आता तीन दशकांचा काळ लोटला. या कालावधीत मी सुमारे सत्तर प्रस्तावना लिहिल्या. त्याचे पुस्तक करावे ही सूचना ‘आई। समजून घेताना', फिरस्ती' इ. लिहिणारे ‘सकाळ'चे माजी समूह संपादक, लेखक, वक्ते आणि माझे माणूस-मनस्वी मित्र उत्तम कांबळे यांची. त्यांनी