पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/226

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कर्मकांडाच्या, अंधश्रद्धांच्या निर्मूलनाबद्दल ते आग्रही होते. ईश्वरकेंद्री मानव व्यवहार मनुष्यकेंद्री व्हावा म्हणून असलेली डॉ. दाभोलकरांची धडपड अधोरेखित करणे या चरित्राचा उद्देश होय. त्या अर्थाने डॉ. राजेखान शानेदिवाण यांना आणि त्यांच्या कुटुंबास मी जवळून ओळखतो. मुस्लीम समाज व हिंदू समाज अथवा कोणत्याही एका विशिष्ट धर्मसमाजात सदासर्वकाळ जसे सनातनी असतात, तसे पुरोगामीपण. डॉ. शानेदिवाण विचार व आचारांनी पुरोगामी, नवमतवादी, आधुनिक असल्यानेच ते हे। करू धजले. ती त्यांची उपजत ऊर्मी होय. ते त्यांना भावते, ते लिहितात, ‘मागणीवरून पुरवठा' असे त्यांच्या लेखनाबाबत घडत नाही. यशवंतराव चव्हाण, मुस्लीम आत्मचरित्रांबद्दल एकूणच समाजाच्या अंतिम हिताचं क्षितिज त्यांना गवसलेले असल्याने जे काही करतात त्यामागे एक विधायक रचनात्मकता असते. हे लेखन त्याच परंपरेतील. त्यांच्या या सततच्या समाज परिवर्तनप्रवण लेखन ध्यास व धडपडीबद्दल अभिनंदन व शुभेच्छा!

◼◼

दि. १४ एप्रिल, २०१७

डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२६ वी जयंती.

प्रशस्ती/२२५