पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/18

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुड्डू (बालकथा संग्रह)

सौ. प्रतिभा साठम

प्रहार प्रकाशन, कोल्हापूर

प्रकाशन-डिसेंबर, २००१

पृष्ठे - ६0 किंमत - ४0/



बालकवितेची ही अंगत-पंगत,

 आहे खरी सुंदर संगत!


 बाल मित्र नि मैत्रिणींनो,

 ‘गुड्डु' तुम्हाला भेटू इच्छितोय! प्रतिभाताईंचा हा ‘गुड्डु' खट्याळ, खोडकर आहे. तुमच्यासारखाच! अभ्यास नको, नुसतं खेळायला हवं त्याला! प्रतिभाताईंनी लिहिलेल्या या कविता. खरं तर त्यांनी आपल्या नातवाच्या ‘गुड्डू'च्या खोड्या पहात त्या लिहिल्यात. तुम्हाला पण त्या वाचायला आवडतील असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी त्या एकत्र केल्या. तुमच्यासाठी छापून त्याचं छान पुस्तक केलं.

 ‘गुड्डु' हा खरं तर गोष्टींचा गठ्ठाच! फक्त प्रतिभाताईंनी त्या सर्व गोष्टी कवितेतून सांगितल्यात. प्रतिभाताई शिक्षिका होत्या. मग आई झाल्या. आता त्या आजी आहेत. त्यांना ‘गुड्डू'सारख्या तुम्हा नातवांशी बोलायला, त्यांना खेळावयला, हसवायला खूप खूप आवडतं बरं का! पण ते सर्व मात्र कवितेतून हं! ‘गुड्डु'त चांगल्या पाच-पन्नास कविता आहेत. अगदी अलीकडेच लिहिलेल्या. त्या अनेक वर्तमानपत्रात ‘बालजगत'मध्ये प्रकाशित झाल्या होत्या. त्या शिक्षिका होत्या म्हणून मी तुम्हाला वर सांगितलेच आहे. त्या शिकवून दमल्या. कंटाळल्या मात्र नाही हं! त्यांची ही कवितेची कवायत मग सुरू झाली.

प्रशस्ती/१७