पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 करते. त्यातून तो जबाबदारीच्या भूमिकेतून कथाबीज निवडतो व त्याचा वेलू कथाभर पसरतो.
 'एकटी' मधील नायिका मंजुळा. तिचं गावात पाय घसरून एकटं राहणं हेच मुळी समाजाच्या लेखी लैंगिक भावना चेतवण्याचं कारण बनून राहतं. कथाकार खामकर यातून समाजमन रंगवून त्यावर टीकास्त्र सोडतात. ते मात्र नेहमीच अबोल, अशब्द असतं म्हणून प्रभावी. त्यांची ही अबोल टीका शैली मला लक्ष्यवेधी वाटते. यातील नायिकेचं उत्तान वर्णन लावण्यापेक्षा पुढे जाऊन शृंगारिक बनतं व तमाशाप्रधान ग्रामीण सिनेमाशी नकळत स्पर्धा करतं असं वाचकास वाटत राहतं. समाजात मंजुळासारखी एकटी। स्त्री सत्शील जगत असूनही तिच्याकडे समाज तिरक्या नजरेनं का पाहतो याबद्दल कथा अव्यक्त आश्चर्य व्यक्त करतं. हेच या कथेचं यश. कारण ती समाजाच्या पुरुषी, लिंगपिसाट वृत्तीचं चित्रण करत मंजुळेबद्दल सहानुभूती व्यक्त करते. तो त्या कथेचा उद्देशही होऊन जातो.
 ‘मरणकळा'मध्ये निसर्ग प्रकोपापुढे माणूस दीन-हीन कसा होऊन जातो हे चंद्रकांत खामकर सांगतात. नदीला पूर येतो व गाव होत्याचं नव्हतं होतं. यात पुरात सापडलेल्या संता, दिनकरची तगमग, जीव मुठीत घेऊन जगणं वाचकांच्या डोळ्याच्या कडा पाणावतं. ते या लेखकाच्या लेखन सामथ्र्याचं प्रशस्तीपत्र बनतं. 'कळ' मधील शेवटची ‘शाळाभेट' कथा म्हणजे टिपिकल झेडपी एज्युकेशनवर उठवलेली झोड म्हणता येईल. वर्तमान प्राथमिक शिक्षक व शिक्षणाधिकारी हे कथेचे नायक-खलनायक दोन्ही भूमिका एकाच वेळी जगून परस्परपूरक वागत ग्रामीण शिक्षणाचा, शिक्षण योजनांचा बोजवारा कसा उडवतात... त्याबद्दल त्याचं ‘ना खंत, ना खेद वागणं, बोलणं, जगणं, लाचारी सारंच किळसवाणं!

 ‘कळ'मधील साच्या कथांतून चंद्रकांत खामकर यांनी ग्रामीण जीवनाची ‘कळ' (मेख व दुःखं!) एकाच वेळी चित्रित करून वाचकाला अंतर्मुख करण्यास भाग पाडलं आहे. अशा 'Compel' करणाच्या या कथा ग्रामीण अस्वस्थ जीवनाची रंग, नस, ठसठस व्यक्त करतात. माझ्यासारख्या शहरी जीवन जगणाच्याच्या मनात त्या वाचताना एक प्रकारचा अपराध बोध तयार होतो. अजून आपण महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत, हिंदी कथाकार प्रेमचंदांनी कल्पिलेला अन्याय, अत्याचार, कर्ज, अंधश्रद्धा, व्यसनमुक्त शेतकरी आपण स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांच्या प्रवासानंतरही निर्माण करू शकलो नसल्याचं शल्य या कथा वाचकांच्या उरी जागवतात, निर्माण करतात. त्यास त्या अस्वस्थ करतात तशाच अंतर्मुखही. या कथा

प्रशस्ती/१४९