पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुगंधी काटे (एकांकिका संग्रह) प्रा. डॉ. बाबासाहेब पोवार मेध प्रकाशन, कोल्हापूर प्रकाशन १९८८ पृष्ठे ७७ किंमत १५/-


समाज जाणिवेच्या प्रबोधक एकांकिका  आधुनिक मराठी साहित्यात एकांकिका हा साहित्य प्रकार सतत नि वेगाने विकसित होऊन राहिला आहे. आजच्या मराठी एकांकिकेस सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असली तरी तिचे रूप हे गेल्या साठ वर्षांच्या सततच्या प्रयोगशीलतेतून साकार झाले आहे.
 रंगमंचावर अभिनित करण्याच्या उद्देशाने लिहिल्या जाणाऱ्या मराठी एकांकिकांचा इतिहास हा केवळ २५-३० वर्षांच्या अल्प सीमेत समाविष्ट असलेला इतिहास होय. आणि म्हणूनच मराठी एकांकिकांत इंग्लंडच्या 'ब्रिटिश ड्रामा लिग' किंवा अमेरिकेच्या 'लिटल् थिएटर' च्या एकांकिका, इतकी कलात्मकता आलेली नाही हे मान्य करायला हवे. आजची मराठी एकांकिका ही समकालीन ज्वलंत विषयांच्या संबंधीची तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून लिहिली जाते. तिच्यातील नाट्यगुणांपेक्षा ती आशयगर्भ कशी होईल इकडेच एकांकिकाकाराचे लक्ष राहात आल्याने एकांकीकेत नाटकामध्ये असलेला एकजिनसीपणा अभावानेच आढळतो. प्रा. बाबासाहेब पोवार यांचा 'सुगंधी काटे' हा एकांकिका संग्रह या सर्व पार्श्वभूमीवर पाहिल्यास फारशी निराशा होणार नाही.
 प्रा. बाबासाहेब पोवार हे लेखक म्हणून नंतर अभ्यासावे लागतील. कारण लेखक, नाटककार हा काही त्यांचा स्थायीभाव नव्हे. ते मूळचे नट

प्रशस्ती / १९
प्रशस्ती/११