पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिवस अकरावीचे(दैनंदिनी) भागवत माळी
अ. भा. साने गुरुजी कथामाला प्रकाशन, मुंबई
प्रकाशन - सप्टेंबर २०१२
पृष्ठे - ११४ किंमत - १00/



काल-चित्र उभे करणारी दैनंदिनी

 ‘अकरावीचे दिवस' ही भागवत माळी यांची वयाच्या १६-१७ व्या वर्षी लिहिलेली दैनंदिनी आहे. इतक्या लहान वयात माणूस सहसा अशी सविस्तर दैनंदिनी लिहीत नाही. त्यांना ती त्या दिवसात लिहावी वाटणे याचे कारण त्या वेळच्या त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत दडले आहे. वडील अल्पशिक्षित. शेतकरी कुटुंबातले. भावांच्या मागणीवरून घराची वाटणी होते. मुलांच्या शिक्षणासाठी ते आपले घोटीसारखे छोटे गाव सोडून टेंभूर्णीसारख्या तालुकासदृश गावी येतात. नोकरीमुळे डाकबंगल्यात असलेल्या कर्मचारी निवासात राहतात. घरी असताना दिवाबत्तीची सोय नसताना अल्पशिक्षित वडील हातात चिमणी घेऊन 'चांदोबा' मासिक वाचत. वडिलांच्या या वाचनवेडाचा संस्कार मुलगा भागवत वर पडला. तो बालपणापासूनच. त्यामुळे इयत्ता अकरावीपर्यंत त्यांचे वाचन प्रगल्भ झाले. घरच्या हलाखीने त्यांना अकाली प्रौढ केल्यानेच १६ व्या वर्षीच्या अल्लड काळात भागवत पोक्तपणे वागत होता हे १९७२ साली लिहिलेल्या या दैनंदिनीवरून स्पष्ट होते.

 १६ ऑक्टोबर, १९७२ ते ७ जून १९७३ असा सुमारे ९ महिन्यांचा काळ भागवत माळी यांनी या दैनंदिनीत शब्दबद्ध केला आहे. हे त्याचे

प्रशस्ती/११२