Jump to content

पान:प्रमाणशास्त्र.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आगंतुक पुरावा. ३१२२. प्रत्यक्ष पुराव्यापेक्षां आगंतुक पुरावा कमी किमतीचा आहे, असे कायदा मानीत नाही, व जेथे प्रत्यक्ष पुरावा देतां येतो, तेथे आगंतुक पुरावा मुळीच मकून देत नाही. तरी प्रत्यक्ष पुरावा दाबून ठेवणे, हे साधारणतः संशय उत्पन्न करिते, आणि यास्तव एका मुद्याविषयी प्रत्यक्ष पुरावा मिळत असतां त्याच मुद्याविषयी फकत आगंतुक पुराव्यावर भरवसा न ठे. वण्याची वहिवाट साधारणतः आहे. इंग्लंडांतील लोकांत सत्याला मोठा मान आहे, आणि असत्य अ. तिशय लाजिरवाणे मानले जाते; म्हणून, तेथें, नजरेनें पाहिलेला मजकूर सांगणाऱ्या साक्षीदाराची प्रत्यक्ष साक्ष, ही आगंतुक पुराव्यापेक्षा विशेष निर्भय आहे, असे साधारणतः ते मानतात. परंतु जा देशांत खोटी प्रतिज्ञा आणि असत्य भाषण यांची विशेष खातरी बा. ळगीत नाहीत, तेथे प्रत्यक्ष पुराव्याचे सापेक्ष वजन फारच कमी असते. १२३. आगंतुक पुराव्याचा बाबीत चुकी होग्याविषयी दर्शनी उघड दुहेरी संभव आहे, हे खरें आहे; कारण साक्षीदार कोडताला फसवितील इतकेंच नाही. परंतु त्यांणी सांगितलेल्या हकीकतींवरून अ. नमान काढितानां कोडताची चुकी होऊ शकेल; पण पक्षान्तरी, ही शेवटील चुकी होण्याचा संभव प्रत्यक्ष पराव्याचा बाबतीत नसतो. आतां उलट पाहतां, शा. बीत झालेल्या हकीकतीवरून उत्पन्न होणारे अनुमान इतके मजबूद होऊ शकेल की, त्यांत चुकी होण्याचा संभव फार थोडा असेल; कारण त्या हकीकती पुष्कळ