Jump to content

पान:प्रमाणशास्त्र.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आगंतुक पुरावा. सांगितले आहे की, अशा ठिकाणी "जो पुरावा हजर "केला असेल त्यासारखे पुरावे पाहिजेत तितके क"ल्पून त्यांचा आधार धरून निवाडा देता येईल किंवा "नाही, याविषयी विचार केला पाहिजे.” याविषयी जे त्याणे लिहिले आहे ते विचारार्ह आहे. जामद्याची शाबिती करावयाची असत्ये त्याशी योग्य रीतीने संबद्ध अशी जर कांहीं आगंतुक पुराव्याची गोष्ट असेल, तर, तेवढ्याच गोष्टीवरून निश्यायक अनुमान स्थापित करता येत नाही, इतक्याच सबबेनें ती नाकबूल करूनये; हा साधारण नियम आहे असे समजले पाहिजे. कारण, एकादी गोष्ट एकटीच अ. सल्याने जी हलक्या वजनाची असल्ये, ती दुसऱ्या गोष्टींशी मिळून ध्यानांत घेतली असतां मोठ्या महत्त्वाची होईल. ... ९६. शाबीत झालेल्या हकीकतींवरून एकादें अनुमान स्थापित करण्यास्तव त्या हकीकतींचा मुख्य गोष्टीशी संबंध निकट व अवश्य असावा; म्हणजे प्रत्यक्ष शाबीत असतां तो पुरावा जसा संशयनिवर्तक असतो तसा तो असावा. कज्जांतील हकीकतींवरून कितीही अंदेशा येऊ, तथापि केवळ अटकळीवरून कोणतेही अनुमान निर्भयाने स्थापित करता येत नाही. विलिस याणे कितीएक पराकाष्ठेचा बोधक कजानी या नियमाचे स्पष्टीकरण केले आहे. ९७. किती आगंतुक पुरावा असला असता अपराधाचे अनुमान करता येईल, याविषयी निश्चय करणे हे केव्हां केव्हां कठीण असते; परंतु म्यानिस