________________
आगंतुक पुरावा. ९०. फौजदारी चौकशीत जा नियमांनी बहुधा आगंतुक पुरावा मान्य केला जातो, त्याच नियमांनी दिवाणी चौकशीत तो मान्य केला जातो; परंतु प्रतिपक्षापेक्षा अधिक मजबूद पुरावा असला म्हणजे दिवाणी कजांत निवाडा देण्यास बस होतो, असे असून त्या शाबितीपेक्षा फौजदारी कजांत को विशेष निश्चित पुरावा मागतात. आतां या जातीचा पुरावा बहुतकरून फौजदारी कज्जांत विशेष साधारणतः आढळतो; कारण, गुन्हे हे बहुधा गुप्ततेने करण्यात येतात, म्हणून ते प्रत्यक्ष पुराव्याने क्वचितच शाबीत करता यतात. ९१. आगंतुक पुराव्यावरून फौजदारी गुन्हा. स्थापित करण्यास्तव शाबीत झालेल्या सर्व हकीकती आरोपित मनुष्याचा अपराधाशी पूर्वापराविरुद्ध अ. सल्या पाहिजेत, इतकेच नाही तर कोणत्याही इतर अनुमानाशी असंबद्ध असल्या पाहिजेत. जर त्या हकीकती एकाद्या इतर कल्पनेशी जमत असल्या, तर अपराधाचे अनुमान निश्चायक होणार नाही, आणि त्यावरून अपराधस्थापन होणार नाही. म्हणून या बाबदीचा विचार करन्ये वेळी आरोपित मनुष्याची तकरार काळजीपूर्वक तपासून पाहिली पाहिजे. कारण, त्यावरून बहुधा कज्जाची खरी स्थिति ध्यानात येऊन ती सर्व घडलेल्या गोष्टींशी जमण्याजोगी आहे, असे दिसून येईल. ९२. हा नियम जा कजांत अमलांत आला आहे तो कज्जा स्टार्कीने लिहिला आहे; तो