Jump to content

पान:प्रमाणशास्त्र.pdf/391

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रक० १९३] नव्या करारांतील पुस्तकांविषयी.-चालू. ३६९ लो पाहिजे.-४ गलती यांस पत्र. गलती प्रांतांतील मंडळ्यांत पाखंडी मत शिकविणान्यांनी प्रवेश करून मोश्याचे संपूर्ण विधिशास्त्र पाळल्यावांचन मनुष्य न्यायी ठरत नाही असे शिकविले. त्यांचे खंडण करण्याकरितां पौलाने या पत्रात असे दाखविले की, नियमशास्त्र ख्रीस्ताकडे पोहंचावयास केवळ गुरु आहे (प्रक० ३४ टीका ३ पाहा) आणि माणूस नियमशास्त्राच्या कमावांचूंन विश्वासाकडून मात्र न्यायी ठरतो.-५.६. ७. ल्फस, फिलिप्पे व कलस्सै एथील मंडळ्यांस पत्रे. तीही पाखंडी मताविरुद्ध असून ख्रीस्तामध्ये देवपणाचे अवघे पूर्णपण शरीररूपे राहते याविषयीं, आणि ख्रिस्ती धर्मातील सिद्धांत मनुष्यांस सुखी करणारे ईश्वरी खरे ज्ञान दाखवितात याविषयी ती पत्रे साक्षीभूत आहेत.-८ व ९. थेस्सलनीकेकरांत दोन पत्रे. प्रभूच्या फिरून येण्याविषयी जी गैरसमज या मंडळीमध्ये उत्पन्न झाली होती ती या पत्रांत दूर केली आहे. -१० व ११. तिमथ्य याला दोन पत्रे (प्रक० १८४ क० १). तिमथ्याला प्रेषिताने आश्या मैनरांतील मंडळयांची देखरेख करण्याकरितां नेमले. तेव्हां ज्या मंडळ्या त्याला सोपून दिल्या होत्या त्यांवर पाळकपणा यथायोग्य रीतीने करावा ह्मणून त्या पत्रांत बोध केला आहे.~१२. तीतास पत्र. तीता नामक पौलाचा दुसरा सहकारी क्रेता नामें बेटावर होता त्यास या पत्रांत वरील विषयाविषयी बोध केला आहे.-१३, फिलेमोनाला पत्र. फिलेमोन कलसैकर याचा कोणी अनेसीम नामें दास होता, तो त्यापासून पळून रोम शहरास गेला. तेथे पौलाकडून तो ख्रिस्ती झाला; त्यानंतर पोलाने त्याला आपल्या धन्याकडे परत पाठविले, त्या वेळेस लिहिलेले हे विनंतीपत्र आहे.-१४. इब्री यांस पत्र, यहदी ख्रिस्ती आपल्या जुन्या यहूदी मतांत पुन्हा शिरतील असे ज्यांविषयी भय होते त्यांस लिहिले. त्यांत तो दाखवितो की, देवाचा पुत्र जो खीत याचे महल जुन्या करारांतील मध्यस्थाच्या महखाहून फार अधिक आहे. आणि जन्या करारांत सांगितलेली धर्मकृये यांचा केवळ लाक्षणिक अर्थ असन खास्त जो मलखीजदेकाच्या रीतीप्रमाणे (प्रक०९क० २, टीका) सनातन प्रमुखयाजक त्यामध्ये त्यांची सर्वकाळपर्यंत टिकणारी पूर्णता आहे २ वरकड प्रेषितांपैकी पेतर, योहान्न, याकोब आणि यहूदा यांचे लेख मिळाले आहेत. पोल कैदी होऊन आश्या मैनरांतील ख्रिस्ती लोका 47 II