________________
३६४ रोम एथे पोलाचे जाणे. [प्रक० १९० अन्न खाले. मग दिवस उगवल्यावर त्यांनी देश ओळखला नाही. मग दोहों प्रवाहांच्या संगमांत पडून त्यांनी तारूं तळास लागावे असे केले, आणि नाळ रुतून गच बसली, पण वराम लाटांच्या जोराने फुटून गेले. शिपायांनी तर मसलत केली की बंदीवानांस मारून टाकावें, नाहीतर कोणी पोहून पळून जाईल. पण पौलाला वांचवावे असे मनांत आणून शतपतीने त्यांच्या बेतास आडवे येऊन आज्ञा दिली की, ज्यांस पोहतां येते त्यांनी पहिल्याने उडी टाकून कांठास जावे; आणि जे राहिले ते कोणी फळ्यांवर व कोणी तारवाच्या तुकड्यांवर बसून जावे. याप्रमाणे होऊन सर्व कांठास सुरक्षित पोहंचले. २. तेव्हां बेटाचे नांव मलिते (मालदा) आहे, असे त्यांस समजले. रानटी लोकांनी तर आमावर असाधारण उपकार केले, कांतर पाऊस व गारठा पडल्यामुळे त्यांनी आगटी पेटविली. मग पौल काडके जमा करून आगटीवर घालीत होता, तेव्हां गरमीमुळे फुरसे निघून त्याच्या हातास झोबून राहिले. रानटी लोकांनी किरडू त्याच्या हाताला लटकलेले पाहून एकमेकांस मटले : " खरोखर हा माणूस घातक आहे. हा समुद्रांतन पार पडला तरी न्याय याला वंचू देत नाही.” परंतु त्याने किरडूं अमीत झटकून टाकले. पण तो मुजावा अथवा अकस्मात् मरून पडावा असी त्यांनी वाट पाहिली, परंतु त्याला काही अपकार झाला नाही असे पाहून ते "हा देव आहे" असे ह्मणाले. पबलिय नामें त्या बेटाचा सरदार त्याची शेते त्या ठिकाणी होती. त्याने त्यांस बोलावून तीन दिवस मेहेरबानीने पाहुणचार केला. पबलियाचा बाप तर दुखणाईत होऊन पडला होता. त्याकडे पोलाने जाऊन प्रार्थना केली व त्याजवर हात ठेवून त्याला बरे केले. हे झाल्यावर बेटांत दुसऱ्या लोकांस रोग होते तेही याजकडे येऊन बरे झाले. मग तीन महिन्यांवर तारवावर बसून ते रोमाकडे जायास निघाले. नंतर रोमास पोहंचल्यावर पौलाला परवानगी होती की, त्याचा राखणारा शिपायी याच्यासंगती त्याने निराळे राहावे. तसे पोल आपल्या भाड्याच्या घरी पूर्ण दोन वर्षे राहिला. आणि कोणी न अडवितां पूर्ण प्रशस्ततेने त्याने देवावे राज्य गाजविले.