________________
३४२ शौलाचा पालट. प्रक० १७८ प्रक० १७८. शौलाचा पालट. (प्रेषि० ९.) १. शौल *) तर अद्याप प्रभूच्या शिष्यांस भेडावण्या व घात करण्याविषयी फार आवेशी असून प्रमुख याजकाकडे जाऊन त्याने त्याजपासीं दमसेकांतल्या सभेस असीं पत्रे मागितली की, त्याला त्या मार्गातले कोणी सांपडले, पुरुष आणि बायकाही, तर त्याने त्यांस बांधून यरूशलेमांत आणावे. मग जातां जातां तो दमसेकाजवळ पोहंचला, तेव्हां त्याच्या भोवता आकाशापासून प्रकाश अकस्मात् चमकला. आणि भूमीवर पडून त्याने असी वाणी आपणासी बोलतां ऐकली की "शौला, शौला, माझा छळ कां करतोस?" तो ह्मणालाः “तूं कोण आहेस?" प्रभूने मटले: “ज्या येशूचा तूं छळ करतोस तोच मी आहे।) अणकुचीवर लात मारणे हे तुला कठीण") तेव्हां शौल कापून व विस्मित होऊन बोललाः “हे प्रभू, म्या काय करावे ह्मणून तूं इच्छितोस?' प्रभूने त्याला मटलेः ऊठ व नगरांत जा, ह्मणजे तुला जे करावे लागते ते तुला कोणी सांगेल." त्यासंगतीं जे मनुष्य जात होते ते तर स्तब्ध उभे राहिले, त्यांनी वाणी ऐकिली खरी, पण कोणाला पाहिले नाही. मग शौल भूमीवरून उठून डोळे उघडिल्यावर त्याच्या दृष्टीस कोणी पडला नाही. मग त्यांनी त्याला हाती धरून दमसेकांत नेले, आणि तो तीन दिवस अंधळा होता व त्याने काही खाले पिलें नाहीं. _*) शील याला पोल हे रोमी नावही होते; हा किलिक्या (आशिआ मैनरांत) यांतील तर्सकर होता. त्याचे आईबाप बन्यामीन कुळांतले यहूदी असून त्यांस रोमी प्रजापण मिळाले होते. त्यांनी आपला पुत्र शोल याला लहानपणापासून न्यायशास्त्री गमलिएल (प्रक० १७४ क ०२) याजकडे न्यायशास्त्र शिकण्याकरिता पाठविले होते. तो ते शिकून शिवाय राहोटया शिवण्याचाही धंदा शिकला, कारण विद्या शिकून खरीज कांही धंदा शिकण्याची व तो करण्याची चाल होती (२ करि० ११,२२. प्रेषि. १६,३७, २२,३; १८,३). +) दुसऱ्या प्रेषितांप्रमाणे पोलाने प्रभूच्या उठण्याचा साक्षी होण्याकरिता त्याला प्रभूने शरीररूपे प्रत्यक्ष दर्शन द्यावे, आणि प्रेषितपणासाठी जसें त्याने दुस-या प्रेषितांस तसें यालाही स्वता बोलावून नेमावें असें अगत्य होते.
- ) न्या देशांत जनावरांस काटे ठोकलेल्या पराणीने हाकीत, त्यावर जर जनावराने लात मारली तर त्यापासन ते आपणाला जखमी मात्र करून घेई..
२. दमसेकांत अनान्या नामें कोणी एक शिष्य होता, त्याला प्रभु दृष्टाताने ह्मणालाः "हे अनान्या "नीट" ह्मटलेल्या रस्त्यांत जा आणि यहूदा