Jump to content

पान:प्रमाणशास्त्र.pdf/354

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३० खीस्ताचे आकाशांत जाणे. [प्रक० १६९ तो त्यांस आशीर्वाद देत असतां आणि शिष्य पाहत असतां तो त्यांपासून वर घेतला गेला,आणि मेघाने त्यांच्या दृष्टीपासून त्याला घेतले. आणि तो जात असतां ते आकाशाकडे निरखून पाहत होते,तेव्हां पाहा, पांढरी वस्त्रे ल्यालेले दोन पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले आणि ते बोलले : "अहो गालीली माणसानो, तुह्मी आकाशाकडे पाहत कां उभे राहिलां? जो तुह्मापासून वर आकाशांत घेतला तोच येशू; जसे तुह्मी त्याला आकाशांत जातां पाहिले, तसाच येईल.” मग ते जाइती झटलेला डोंगर तेथून यरूशलेमांत परत आले. तेथे आल्यावर ते सर्व व बायका आणि येशूची आई मारया व त्याचे भाऊ ही एक चित्ताने प्रार्थना व विनती करण्यांत तत्पर राहिली. सूचना. आकाशांत जाऊन खीस्ताने जगाच्या मांडण्यापूर्वी जो महिमा त्याला बापापासीं होता तो,आणि मनुष्य होतेसमयीं ज्याकडून त्याने आपणाला रिक्त केले होते ते देवाचे रूपही त्याने परत घेतले. ज्या ठिकाणी देव आहे, त्या ठिकाणी आकाश आहे. परंतु देव सर्व ठिकाणी असल्यामुळे ख्रीस्ताचे आकाशांत जाणे हे ईश्वरी सर्वव्यापकता ग्रहण करणे असे आहे. या कारणास्तव बापाजवळ जाते वेळेस खीस्ताने आपल्या शिष्यांस सांगितले की: “पाहा, काळाच्या समाप्तीपर्यंत मी तुह्माबरोबर सर्वकाळ आहे" (मात्थी २८, २०). आणखी तो असेही ह्मणालाः “जेथे दोघे तिघे माझ्या नामाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे" (मात्थी १८, २० ). यास्तव खील आमचा तारणारा तो देव व मनुष्य मिळून असा सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापक असतां देव जो बाप त्याच्या उजवीकडे बसला आहे. त्याने त्याला सर्वसत्ता, अधिकार, पराक्रम व धनीपण देऊन किंबहुना प्रत्येक नाम. जे इहलोकींच केवळ नव्हे तर परलोकीही झटले, त्यापेक्षां फार उंच केले आहे, आणि अवघी त्याच्या पायांखाली ठेवली आणि त्याला अवघ्यांचा मस्तक असे करून मंडळीला दिले आहे; तीच त्याचे शरीर आहे (एफस० १, २०-२२). काळाच्या समाप्तीस तर तो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायाला परत येईल आणि अवध्या गोष्टींची पूर्णता करील. GENERA NATIVA सावजानेक वाचवाला खेड, (पुणे.)