________________
अनुमानें. २५ कोडतांनी, किंवा माजिस्लेटांनी केलेल्या फैसलनाम्याचा शुद्धपणाविषयीं हैं अनुमान खरोखर केव्हां केव्हां निश्चायक असते, असे आपणास पुढे कळेलच. आणि याच सबबेवरून इनसाफाचा कोडताची सर्व दफ्तरें, आणि कायद्याने ठरविलेली सर्व सरकारी रजिस्टरे, ही शुद्ध आहेत, असे कायदा अनुमान करतो. याच उद्देशाने अनीति, किंवा गैरवर्तणूक, किंवा कपट, ही कायद्याने अनुमित होत नाहीत. आणखी बिनहुद्याचा माणसाचा व्यवहारास कित्येक प्रसंगी हाच नियम लागू आहे. उदाहरण, पुरातन खत, किंवा मृत्युपत्र, ही योग्य रीतीने पुरी झाल्याविषयीं, किंवा पुरातन पत्रे, नोंदण्या आणि पावत्या इत्यादिकांचा खरेपणा व असलपणाविषयीं, कित्येक प्रसंगी कायदा निश्यायक अनुमान करतो ( या ग्रंथाचे कलम २०२ पहा) आणि जो आयातीचा किंवा निर्गतीचा माल मांडवीत नोंदलाच पा. हिजे, तो माल योग्य रीतीने नोंदला आहे, असे अनुमान आहे; आणि निरपराधाविषयींचा अनुमानाचा या अनुमानाशी किती निकट संबंध आहे, हे अशा उदाहरणावरून दिसून येते. बिल्ल-आफ्-एकश्येंज व प्रामिसरी नोटी ही चांगल्या व पुरत्या सबबेनें लिहून दिली आहेत, असे इंग्रेजी कायदा प्रथमदर्शनी अनुमितो, परंतु निश्चयात्मक अनु. मित नाही; म्हणून त्या अनुमानाविरुद्ध शाबिती केली (1) बिलू आफ एक्श्ये म्हणजे हुंडी. त० (५) प्रामिसरी नोट म्हणजे वायदेचिठी. त०