Jump to content

पान:प्रमाणशास्त्र.pdf/312

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८८ यरीहो एथील अंधळा. जाक्खी. [प्रक० १४४ बोललाः “हे बापा, वा माझे ऐकले ह्मणून मी तुझा उपकार मानतो?" आणि असे बोलून तो मोठ्याने ओरडलाः “लाजारा, बाहेर ये?" तेव्हां जो मेला होता तो बाहेर आला, त्याचे पाय व हात वेष्टणांनी बांधलेले होते येशूने त्यांस मटले. "त्याला मोकळे करा व जाऊं द्या." ४. तेव्हां ज्या यहूद्यांनी मारयेकडे येऊन येशूने केलेली कामे पाहिली त्यांतून बहुत त्याजवर विश्वासले. पण त्यांतून कित्येकांनी परोश्यांकडे जाऊन येशूने केलेली कामे त्यांस सांगितली. यावरून त्यांनी सभा मिळवून झटले: “आपण काय करतो? तो माणूस बहुत चमत्कार करतो आह्मी त्याला असे असूं दिले, तर सर्व त्याजवर विश्वासतील, मग रोमी लोक येऊन आमचे ठिकाण व राष्ट्रही घेतील.” त्यांतील एक तर कायफा नामे त्या वर्षी मुख्य याजक होता, तो त्यांस ह्मणालाः "तुह्मी कांहीं जाणत नाहीं आणि लक्षात आणीत नाहीं की, लोकांकरितां एका माणसाने मरावे आणि सर्व राष्ट्राचा नाश होऊ नये हे आह्मास उपयोगी आहे.” हे तर तो आपल्या आपण बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता, ह्मणून त्याने भविष्य सांगितले की, येशू या राष्ट्राकरितां मरणार आहे; आणि त्या (इस्राएल) राष्ट्राकरितां असे केवळ नाही, तर यासाठी की त्याने देवाच्या पांगलेल्या लेकरांसही एकत्र मिळवावे. तर त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा मनसोबा केला, आणि तो कोठे आहे असे जर कोणाला कळले असेल तर त्याला धरण्याकरितां त्याने सूचना करावी असी आज्ञा त्यांनी केली. प्रक० १४४. यरहो एथील अंधळा. जाकखी. (मात्थी २०. मार्क १०. लूका १८ व १९.) आणि असे झाले की, येशू यरीहोजवळ आल्यावर कोणी बार्तीमी नामक अंधळा वाटेवर भीक मागत बसला होता. आणि येशू जवळून जात आहे हे ऐकून तो ओरडत बोलला : “हे येशू, दावीदाच्या पुत्रा (मशीहा), मजवर दया कर!" तेव्हां त्याने उगेच राहावे ह्मणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दबाविले, पण तो अधिकच ओरडला की: " हे दावीदाच्या पुत्रा, मजवर दया कर!" तेव्हां येशूने उभे राहून त्याला विचारले: “म्या तुजसाठी काय करावे ह्मणून मागतोस?" तो बोललाः