________________
प्रक० १३३] फेपरेकरी मुलगा, पट्टी देणे. २७५ लागला. मग येशूने त्याच्या बापाला पुसले की: "हे याला होऊन किती काळ झाला!" तो ह्मणालाः “बाळपणापासून ; आणि त्याने त्याचा घात करण्याकरितां त्याला बहुत वेळां अग्नीत व पाण्यात टाकले; परंतु तुझ्याने कांहीं करवेल तर आमावर करुणा करून आमचे सहाय कर!" येशू त्याला ह्मणालाः “तुझ्याने विश्वास धरवेल तर; विश्वास धरणान्याला सर्व साध्य होते." तेव्हांच त्या मुलाचा बाप डोळ्यांस आसवें आणून असे ओरडला की: "हे प्रभू , मी विश्वास धरितो, माझ्या अविश्वासाविषयी मला सहाय कर!" मग येशूने त्या अशुद्ध आस्याला धमकावून मटले: “यांतून निघ असी मी तुला आज्ञा करतो." तेव्हां आत्मा त्याला फार पिळून निघाला आणि मुलगा मेल्यासारखा झाला. पण येशूने त्याचा हात धरून त्याला उठविले आणि त्याला बरे करून त्याच्या बापाजवळ परत दिले. नंतर घरी आल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला पुसले की : “आमच्याने त्याला कां काढवले नाही?" येशू त्यांस ह्मणाला : “तुमच्या अविश्वासामुळे; कारण की मी तुह्मास खचीत सांगतो, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास तुह्मास असला तर तुमच्याने होणार नाही असे काही नाही." २. नंतर ते कपरणामांत आल्यावर पट्टी घेणारे पेतराकडे येऊन बोलले : " तुमचा गुरू पट्टी *) देतो की नाही?" त्याने मटले : " देतो." मग तो घरांत आल्यावर येशू त्याच्या अगोदर बोललाः " शिमोना, तुला कसे वाटते? देशाचे राजे कोणापासून जकात व पट्टी घेतात, आपल्या पत्रांपासून किंवा परक्यांपासून?" पेतर त्याला ह्मणाला : “परक्यांपासून." येशने त्याला मटले: “तर मग पुत्र मोकळे आहेत +). पण आमी त्यांस अडखळवू नये ह्मणून तूं जाऊन समुद्रांत गळ टाक, आणि जो पहिला मासा वर येईल तो धर आणि त्याचे तोंड उघडून तुला रुपया सांपडेल, तो घेऊन मजसाठी व तुजसाठी त्यांस दे."
- ) ही पट्टी देवळाची वार्षिक पट्टी होती, आणि ती प्रत्येक प्रौढ इस्राएली माणस यास देणे पडत असे.
वास्तविक पाहिले असतां खीस्त देवाचा पुत्र व मशीहाराजा असल्यामळे त्याला आपल्या बापाच्या घराची पट्टी देण्याची गरज नव्हती.