________________
प्रक० १३२] येशूविषयीं पेतराचे पत्करणे. खीस्ताचे रूपांतर. २७३ मंडळी रचीन आणि तिजवर अधोलोकाच्या दरवाज्यांचे बळ चालणार नाहीं *). आणि मी तुला आकाशाच्या राज्याच्या किल्लया देईन, पृथ्वीवर जे कांहीं तूं बंद करसील ते आकाशांत बंद होईल; आणि पृथ्वीवर में कांहीं तूं मोकळे करसील तें आकाशांत मोकळे होईल").
- ) प्रेषितांमधे पहिला तो पेतर आहे, असे प्रभने एथे दाखविले आहे. त्याने इमारतरूपी ख्रिस्ती मंडळीचा पाया घालावा, ह्मणून प्रभूने त्याला निवडून घेतले आणि हेच त्याचे वरिष्ठपण आहे.
क) पापापासून मोकळे करायास किंवा बंद करायास जो अधिकार खीस्ताच्या नावाने व त्याच्या आज्ञेवरून प्रेषितांस प्राप्त झाला तो लाक्षणिक रीतीने बांधायाच्या व सोडायाच्या किल्लयांकडून दाखविला आहे. हा अधिकार प्रभूने पेतराला मात्र दिला असें नाहीं, जसा त्याला तसा सर्व प्रेषितांसही दिला (मान्थी १८,२८). २. त्या वेळेपासून येशू आपल्या शिष्यांस कळवू लागला की: “म्या यरूशलेमास जाऊन बहुत दुःखें सोसावीं व मला जिवे मारावे व तिसऱ्या दिवसी म्या पुन्हा उठावे याचे अगत्य आहे." तेव्हां पेतर त्याला घेऊन दबावं लागलाः "हे प्रभू, तुजवर दया असो, हे तुला होणार नाही!" पण येश मरडन पेतराला ह्मणालाः "अरे सैताना, माझ्यामागे हो, तूं मला अडखळा आहेस, कारण तूं देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहींस, माणसाच्या गोष्टींकडे लावतोस"*). तेव्हां येशूने आपल्या शिष्यांस मटले: “जर कोणी माझ्यामागे यायास इच्छितो तर त्याने आपणाला नाकारावे आणि आपला खांब उचलून घेऊन माझ्यामागे यावे. कांकी जो कोणी आपला जीव राखायास इच्छितो तो त्याला मुकेल; पण जो कोणी मजकरितां आपल्या जिवाला मुकेल, तो त्याला मिळवील. माणूस सगळे जग जर मिळवील पण आपल्या जिवाची हानि पावेल तर त्याला काय लाभ होईल?"
- ) 'अरे सैताना, माझ्या मागें हो,” असें पेतराला बोलल्याने त्याच्या अडखळ्याचा जगम सैतानाकडन आहे असें खीस्ताने दाखविले आहे. नुक्तीच पेतराला देवाच्या आत्म्याकड़न हर्षाने येशूला पत्करण्याविषयी प्रेरणा झाली, त्याचप्रमाणे आता या अडखळ्याच्या बोलण्याविषयी त्याने वाईट आत्म्याला आपणास प्रेरणा करूं दिली. ३ मग सहा दिवसांनंतर येशूने पेतर व याकोब व योहान यांस
वर घेऊन त्यांस उंच डोंगरावर एकीकडे नेले. तेव्हां त्याचे रूप मांच्या देखतां पालटले. त्याचे तोड सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि याची वस्त्रे उजेडासारखी पांढरी झाली. आणि पाहा, मोशे व एलिया 35 H