Jump to content

पान:प्रमाणशास्त्र.pdf/287

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रक० १२५] आकाशाच्या राज्याविषयी सात दाखले. २६३

  • ) मनुष्याने समजन उमजन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेविरुद्ध आपणाला कठीण करून घ्यावे, आणि प्रसिद्ध केलेलें जें तारण त्याचा धिक्कार करावा व त्यास नाकवूल व्हावें हेच पवित्र आत्म्याविरुद्ध पाप आहे. असल्या मनुष्यासाठी अणखी दुसरा उपाय काहाँ नाही. परोशी हे देवाच्या आत्म्याकडून येशू चमत्कार करीत आहे असें जाणत असताही तो ते सैतानाच्या सामर्थ्याने करितो असे त्यांनी म्हटले, यावरून पवित्र आत्म्याविरुद्ध अघोर पाप करायास ते प्रवर्त्तले हे सिद्ध आहे. प्रक०१28. आकाशाच्या राज्याविषयों सात दाखले.

( मात्थी १३. मार्क ४. लूका ८.) १. त्यानंतर येशू समुद्राजवळ गेला आणि त्याजवळ मोठा समुदाय मिळाला. ह्मणून तो तारवांत जाऊन बसला आणि सर्व समुदाय तडीवर उभा राहिला. तेव्हां तो दाखले देऊन त्यांस उपदेश करूं लागला, आणि शाणालाः "कोणी पेरणारा पेरायास निघाला. तेव्हां कांहीं बी वाटेवर पडले आणि पांखरांनी येऊन ते खाऊन टाकले. आणि फारसी माती नव्हती अशा खडकाळीवर काही पडले, पण सूर्य उगवल्यावर ते करपले व त्यास मूळ नसल्यावरून वाळून गेले. आणि कांहीं कांटेन्या झाडांमध्ये पडले, मग कांटेऱ्या झाडांनी वाढून ते गुदमारले.-पण चांगल्या भूमीवर कांहीं पडले, आणि कोठे शंभरपट, कोठे साठपट, कोठे तीसपट असे पीक आले. ज्याला ऐकायास कान आहेत तो ऐको! -दाखल्याचा अर्थ तर असा आहे : बीं देवाचे वचन आहे.राज्याचे वचन कोणीएक ऐकून समजत नाहीं, तेव्हां तो दुष्ट येतो आणि त्याच्या अंतःकरणांत पेरलेले ते हिरावून घेतो; वाटेवर पेरलेला तो हाच आहे *). खडकाळीवर पेरलेला तो हाच आहे की, वचन ऐकतो, तेव्हांच ते आनंदाने घेतो. पण त्यामध्ये मूळ नाही ह्मणून तो क्षणिक आहे, आणि वचनामुळे क्लेश किंवा छळ झाला ह्मणजे तो लागलाच अडखळतो. आणि कांटेया झाडांमध्ये पेरलेला, हाच आहे की, वचन ऐकतो परंत या जगाची चिंता व द्रव्याची भूल ही वचने गुदमारतात, ह्मणन याला फळ येत नाही. आणि चांगल्या भूमीवर पेरलेला तो हाच आहे कीं वचन ऐकून समजतो, तो फळ देतोच." . *) ज्या मनुष्याचे अंतःकरण पश्चात्तापरूप नांगराच्या फाळाने नांगरलेले नाही आणि विश्वासाकड़न देवाच वचन घेण्यासाठी तयार झाले नाही असल्या मनष्याचं अतः