Jump to content

पान:प्रमाणशास्त्र.pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४८ येशूचे शिष्य. [प्रक० ११६ तारवांत होते, त्यांनी येऊन आपले सहाय करावे ह्मणून त्यांनी त्यांस खुणा विले. ते आले आणि त्यांनी दोन्हीं तारखें इतकी भरली की ती बुडूं लागली. शिमोन पेतर हे पाहून येशूच्या पायां पडून बोललाः “हे प्रभू, मजपासून जा, कारण मी पापी माणूस आहे,”–कांकी त्याला व त्याजवळच्या सर्वांस विस्मयाने व्यापले, आणि त्याचा भाऊ आंद्रया व शिमोनाचे भागीदार याकोब व योहान यांसही तसेच झाले. तेव्हां येशू त्यांस ह्मणालाः "माझ्या मागे या, ह्मणजे मी तुह्मास माणसे धरणारे करीन." मग ते तारवे कांठी लावून सर्व सोडून त्याच्या मागे चालले. २. मात्थी ९. मार्क २. लूका ५ - नंतर काही दिवसांनी येशू निघून पुन्हा समुद्राकडे गेला. तेव्हां सर्व समुदाय त्याजवळ आला आणि त्याने यांस उपदेश केला. आणि जवळून जातांना त्याने लेवी, ज्याला मात्थीही ह्मणतात, त्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला मटले: "माझ्या मागे ये." तेव्हां तो सर्व सोडून उठून त्याच्यामागे चालला. नंतर लेवीने आपल्या घरी त्याच्यासाठी मोठी जेवणावळ केली. तेव्हां बहुत जकातदार व पापी हे येशू व त्याचे शिष्य यांबरोबर जेवायास बसले. तेव्हां शास्त्री व परोशी यांनी त्याला जकातदार व पापी यांबरोबर जेवितांना पाहून त्याच्या शिष्यांस ह्मटले: “जकातदार व पापी यांजबरोबर तुमचा गुरु कां जेवतो?" * ) मग येशूने ऐकून त्यांस ह्मटले: “निरोग्यांस वैद्याची गरज नाही, तर दुखणाईतांस आहे. मी नीतीमानांस नाही तर पाप्यांस पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो."

  • ) रोमी सरकारची जकातीची वाब होती, आणि त्या सरकारांतून कोणी जकातीचा मक्ता घेत असत त्यांच्या पोटात दुसरे लोक मक्ता घेत, आणि हे पोट मक्तेदार जकात घेत असत, झणून त्यांस जकातदार असे झटले आहे. आपण त्या धिक्कारलेल्या अन्यधर्मी हनी लोकांस जकात द्यावी हे यहदी लोकास अतिशय वाईट वाटत असे, आणि जकातदार लोक बहुतकरून अन्यायाने व जुलुमाने जकातीचा पैसा वसूल करीत असत यामुळेही ते त्यांचे फारच द्वेषी होते. यहदी लोकांपैकी जर कोणी जकातदार झाला तर त्यास धर्मभ्रष्ट मानन त्याला भजनगृहांत येऊ देत नसत. याप्रमाणे जकातदार व पापी यांस सारखे मोजीत होते.

३. मात्थी १०. मार्क ३.लूका ६.-आणि येशूने आपल्या शिष्यांस बोलाविले व त्यांतून बारा जण निवडून त्यांस उपदेश करण्यास पाठवाया