Jump to content

पान:प्रमाणशास्त्र.pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४० येशूचा बाप्तिस्मा व परीक्षा. प्रक० ११० आकाशांतून असी वाणी झाली की: "हा माझा प्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे." ।। *) येशूला स्वताच्या पापांविषयीं दुःख करायाची गरज होती म्हणून त्याने पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घेतला असे काही नाही, तर जगाच्या पापांचा दंड भरायाला आणि त्यांसाठी प्रायश्चित्त करायाला ज्या अर्थी त्याने पतकरलें होते, त्या अर्थी आमच्या पापांविषयीं दुःख करायास त्याने पश्चात्तापाचा वाप्तिस्मा घेतला. २. नंतर येशूची सैतानाकडून परीक्षा व्हावी ह्मणून त्याला आत्म्याने रानांत नेले *). आणि तो ४० दिवस व ४० रात्री उपासीं राहिल्यावर त्याला भूक लागली. आणि परीक्षक त्यापासीं येऊन बोललाः "तूं देवाचा पुत्र असलास तर या धोड्यांच्या भाकरी व्हाव्या ह्मणून सांग." येशूने उत्तर दिले: "मनुष्य केवळ भाकरीने वांचेल असे नाही, तर जे कांहीं वचन देवाच्या तोडांतून निघेल तेणेकडून वांचेल.”—मग सैतानाने त्याला पवित्र नगरांत नेले, आणि देवळाच्या कंगोऱ्यावर त्याला उभे करून मटले: “तूं देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक, कांकी असे लिहिले आहे : तो आपल्या दूतांस तुजविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यासी आपटू नये ह्मणून ते तुला हातांनी धरतील.' येशूने त्याला मटले: “अणखी लिहिले आहे: प्रभु जो तुझा देव त्याची परीक्षा पाहूं नको.”—फिरून सैतानाने त्याला फार उंच डोंगरावर नेले, आणि जगांतील सर्व राज्ये व त्यांचे वैभव ही त्याला दाखवून झटलेः "जर तूं पायां पडून मला नमसील तर हे सर्व तुला देईन.” तेव्हां येशू याला ह्मणालाः “अरे सैताना, दूर हो, कांकी प्रभु तुझा देव याचे नमन कर व याचीच सेवा कर, असे लिहिले आहे" + ). तेव्हां सैतान त्याला सोडून गेला आणि दूत येऊन त्याची सेवा करूं लागले. *) पहिला आदाम परीक्षेत टिकला नाही, या कारणास्तव त्याने जे बिघडिलें,तें पूर्वस्थितींस आणणारा खीस्त जो दुसरा आदाम, त्याचीही सैतानाकडून परीक्षा व्हायाचे अगत्य होते. +) जसे पहिल्या मनुष्याच्या परीक्षेत सैतानाने दुष्ट वासना, झणजे देहाची वासना, डोळयांची वासना आणि संसाराची बढाई यांविषयी सुचविले, त्याचप्रमाणे खीस्ताची परीक्षा करते वेळेसही त्याने या गोष्टींकडे वळावे झणन सैतानाने यत्न केला.