Jump to content

पान:प्रमाणशास्त्र.pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३६ पूर्व प्रदेशांतून आलेले मागी लोक. प्रक० १०७ तरी तुझ्या ठायांतून मजसाठी अधिकारी व्हायाला जन निघेल. मीखा ५, २.” तेव्हां हेरोदाने त्या मागी लोकांस गुप्तरूपे बोलावून त्यांपासून तारा दिसण्याची वेळ निट विचारून घेतली, आणि त्यांस बेथलहेमास पाठवितांना मटले: “तुह्मी जाऊन बाळकाचा चांगला शोध करा, मग तुह्मास शोध लागल्यावर मला वर्तमान सांगा, मणजे मीही येऊन त्याला नमन करीन." - * ) मागी लोकांविषयों प्रक० ८८ क ० १. टीका पाहा.- प्राचीन ग्रंथकार यांनी असे लिहिले आहे की, जो सर्व पृथ्वीचा अधिकार मिळवील असा सार्वभीमराजा तो यह दामध्ये जन्मल, याविषयी त्या काळी सर्व पूर्व प्रदेशांतील लोक आशा धरून राहिले होते. कारण जुन्या करारांतील मशीहा किंवा स्त्रीस्त याविषयी जी वचनें आहेत ती यहद्यांपैकी जे देशांतरास जाऊन राहिले होते, त्यांकडून बहुधा विदेशी लोकांस कळली असतील. परंतु मागी लोक यांचा अध्यक्ष दानीएल होता ( प्रक० ८८ क ०२. ) म्हणून त्यांच्या वगातव्या लोकांमध्ये विशेषेकरून वरील आशा राहिली असावी, हे उघड आहे. २. तेव्हां ते निघाले, आणि जो तारा त्यांनी पूर्व देशांत पाहिला होता, तो त्यांच्या पुढे चालला, आणि बाळक होता, तेथे जाऊन वरतीं राहिला. तर तारा पाहून ते अत्यंत आनंद पावले. आणि घरांत जाऊन त्यांनी बाळक, त्याची आई मारया इजजवळ पाहिले, आणि पाया पडून त्याला नमन केले; मग आपल्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने व ऊद व बोळ असी दाने त्याला अर्पिली. आणि हेरोदापासी फिरून जाऊं नये असी स्वप्नांत सूचना मिळाल्यामुळे ते आपल्या देशास दुसऱ्या वाटेने गेले * ).

  • ) जे कोणी विदेशी असतधर्मी लोक तारणाऱ्या पुढे गडघे टेकून त्याच्या पाया पडले त्यांत पूर्वदेशांतील मागी लोक हे पहिले होते. त्यांस खीस्ताचे दर्शन झाले, झणून कित्येक नीस्ती देशांमयें एक सण एपिफनी (दर्शनाचा सण) असा म्हटला आहे; त्या दिवसी या गोष्टीची अठवण करितात, आणि सर्व देशांतील असन्धमा लोकांस तारणान्याची ओळख होईल, म्हणजे ते तारणा-याकडे येऊन त्यापुढे आपलेही गुडघे टेकतील, असी आशा धरून शुभवर्तमान कळविण्याचे अगत्याचे काम आपल्या हातांत ठेवलेले आहे, असे कबूल करतात.

३. आणि प्रभूचा दूत योसेफास स्वप्नांत दिसून ह्मणालाः "ऊठ, बाळक व त्याची आई यांस घेऊन मिसर देशांत पळून जा, आणि मी तुला सांगेन तोपर्यंत तेथे राहा, कारण बाळकाचा घात करायास हेरोद त्याचा शाध करणार आहे.” मग योसेफ उठून बाळक व त्याची आई यांस