________________
प्रतिबंध. ३३. आपल्या पूर्वीचा खताविरुद्ध, म्हणण्याविरुद्ध, किंवा जा निवाड्यास तो पक्षकार असेल त्या निवाड्याविरुद्ध वाद सांगण्यास त्या पक्षकाराला बं.. दी असत्ये, त्या बंदीस 'प्रतिबंध' असे म्हणावें. ३४. इंग्रेजी कायद्याप्रमाणे प्रतिबंधाचा जाति तीन आहेतः-(१) सरकारी दफ्तरांतील विषयाने; (२) खताने; (३) साधारण प्रख्यातीचा विषयाने असे तीन प्रकारचे प्रतिबंध आहेत. ३५. (१), सरकारी दफूतरांतील विषयाने प्र. तिबंध.- न्यायाचा कोर्टाचे दफ्तर काळजीने व खचितपणाने लिहिलेले असते, असे शास्त्राने अनुमित आहे; आणि, वादाचा शेवट व्हावा यास्तव ते दफ़्तर खरे आहे, असें, शास्त्र निश्च यात्मक अनुमान करते आणि पुढे सांगितले आहे त्याप्रमाणे जा निवाड्यांत तो मनुष्य पक्षकार किंवा संबंधी नसतां त्या निवाड्यांत जा बाबतींचा निर्णय झाला असेल तेवढ्या खे. रीज करून, कोणासही त्या विरुद्ध शाबिती करण्याचा अधिकार कायदा देत नाही. उदाहरण, कज्जा योग्य रीतीने चालविला होता, असे दफ्तरावरून दिसून येत असल्यास, जो मनुष्य त्यांत पक्षकार असे. ल त्यास त्या गोष्टीचा विरुद्ध वाद सांगतां येत नाही, किंवा एकादी जबानी अशुद्ध रीतीने दफ्तरांत लिहि. ली आहे, असे दाखविण्याचा पुरावा घेतला जाणार नाहीं ( या ग्रंथाची कलमें ३४८, ३५७ व ३५८ पहा).