Jump to content

पान:प्रमाणशास्त्र.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुराव्याचा बोजा. "असेल तेव्हां अशा ठिकाणी त्याचा दाव्याचा आधा"रास त्या नास्तिपक्षाची शाबिती आवश्यक आहे, "म्हणून अशा प्रत्येक खटल्यांत" त्याणे ते नास्तिपक्षकथन शाबीत केले पाहिजे. ३१. जर एकाद्या पक्षकारास अनुकूळ असें निवार्य अनुमान कज्जांत उत्पन्न होईल, तर त्या यो• गानें सामनेपक्षकारावर पुराव्याचा बोजा पडेल. जसे, साधारण अनुमानाने मनुष्य निदोष आहे, म्हणून, अमुकाने गुन्हा केला आहे, असे कोणी म्हणत असल्यास शाबितीचा बोजा तसे म्हणणारावर पडतो. सर्व व्यवहार चोख आहे, असे अनुमान कुप्त आहे, म्हणून, अमुक ठिकाणी लबाडी झाली आहे, असे कोणी म्हणेल तर असे म्हणणारावर त्याचा शाबितीचा बोजा पडतो; आणि कोणताही रोखा चांगल्या व पुन्या सबबने लिहून दिला असतो, असे अनुमान आहे, म्हणून, ती सबब नाकबूल करणान्या पक्षका. रावर पुराव्याचा बोजा पडतो. ३२. जर कोणतीही गोष्ट पक्षकारांपैकी एका. चा विशेष माहितींतील असेल, तर ती त्याणे शाबीत केली पाहिजे असे दिसते. उदाहरण, परवान्यावांचू. न दारू वगैरे विकण्याबदलचा खटल्यांत, आपणापाशी परवाना आहे, म्हणून प्रतिवादीचे म्हणणे असल्यास त्याची शाबिती व्याणे केली पाहिजे; परंतु असें ठरविण्यांत आले आहे की, अशा खटल्यांत प्रतिवादी याजवर पुराव्याचा बोजा पडण्यापूर्वी अशा कज्जांतून प्रथम फिर्यादीकडून काही पुरावा आला पाहिजे.