पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वेळी मी एका परिसंवादात विचारले होते, की जर का सर्व कारखानदार आणि नोकऱ्या देणारे आमच्याकडे या, नोकऱ्या घ्या म्हणून विद्यार्थ्यांच्या मागे लागले आहेत अशी परिस्थिती असती, तर मंडल आयोगावरचे हे आंदोलन झाले असते का? या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे शोधणारे राजकारणी सापडणे कठीण.
 गेल्या दहा वर्षांतील राजकारणाकडे नजर टाकली, तर असे लक्षात येते, की आपली दिशा हरवली आहे. ती पुन्हा सापडेल किंवा नाही? या परिस्थितीत तरी मी फारसा आशावादी नाही. आखाती प्रदेशात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम आपल्या राजकारणावर काय होईल, हे आजच सांगता येत नसल्याने पुढच्या दहा वर्षांचा अंदाज मांडणेही अशक्य आहे.

(६ फेब्रुवारी १९९१)

◆◆

पोशिंद्यांची लोकशाही / १६