पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परखडपणे विचारल्या जाव्यात, हे योग्यच आहे. १९८० मध्ये मी म्हटले होते, की आंदोलनांच्या डावपेचासंबंधी तुमच्या मनात येतील ते प्रश्न अवश्य विचारा; पण काही प्रश्नांना मी लगेच उत्तरे दिली नाहीत, तर राग मानू नका. लढाईतील डावपेचासंबंधी सगळीच रहस्ये खुली करण्यासारखी नसतात. याचा फायदा घेऊन, जातीयवादी शरद जोशी विकले गेले अशा हाकाट्या मारू लागतील. संघटनेने ठरवलेले धोरण जातीयवादाला रोखणारे आहे याचा हा पुरावा आहे. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यवर्षाच्या लढाईचा अंतिम चरण अगदी नजीक आला आहे. लढाई जिंकल्यानंतर विजयोत्सवानंतर या रणनीतीचे सगळे अर्थ सांगता येतील आणि समजूही शकतील. तोपर्यंत "सौराज्य मिळवायचं औंदा" एवढा एकच विचार मनात बाणवून ठेवावा.

(६ नोव्हेंबर ९४)

◆◆







पोशिंद्यांची लोकशाही / ७७