पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


काँग्रेसला पर्याय नाही?


 पल्या सरकारच्या कारकिर्दीची तीन वर्षे पुरी झाल्यानिमित्ताने पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी लाल किल्ल्याच्या समोरील मैदानावर एकपक्षीय मेळावा घेतला. पंतप्रधान एरव्ही मोठे सौजन्यशील आणि विनम्र व्यक्तिमत्त्वाचे; पण त्यांनाही एका गोष्टीची बढाई मारल्याखेरीज राहवले नाही. बहुमताचा पाठिंबा नसलेले सरकार तीन वर्षे चालवले आणि आजमितीस त्यांचे सरकार बहुमतात आहे; पुरी पाच वर्षांची मुदत संपेपर्यंत त्याच्या अस्तित्वाला आज तरी काही धोका दिसत नाही. याचा त्यांनी मोठ्या अभिमानाने उल्लेख केला.
 जनता पक्षाचे सरकार पूर्ण बहुमत घेऊन, १९७७ मध्ये सत्तेवर आले आणि अठरा महिन्यांत कोसळले. १९८९ मध्ये जनता दलाच्या नावाखाली विरोधी पक्षांचे आघाडीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आले. जनता पक्षाच्या वेळी झालेल्या चुका यावेळी होऊ द्यायच्या नाहीत. कोणत्याही परिस्थितीत सरकार पडू द्ययचे नाही असा मनाशी निश्चय करत, विश्वनाथ प्रताप सिंगांचे मंत्रिमंडळ अधिकारावर आले आणि वर्षभराच्या आतच ते कोसळले.

 राज्यपातळीवर, एवढेच काय, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, साखर कारखाने, सहकारी सोसायट्या या सगळ्या पातळ्यांवर येणारा अनुभव असा, की काँग्रेसवाले सत्ता सांभाळून ठेवतात आणि विरोधक एकमेकांत लाथाळी सुरू करून सगळेच आपटी खातात. केवळ विरोधी राजकीय पक्षांना याबाबत जबाबदार ठरवून, दोष देता येणार नाही. अगदी शेतकरी संघटनेची कार्यकर्ते मंडळी ज्या काही थोड्या ठिकाणी सत्तेवर आली, तेथे तेथे साखर कारखाने, जिल्हा बँका, कृषी उत्पन्न बाजार समित्या, पंचायत समिती इत्यादी संस्थांत पुष्कळदा असेच घडले. निवडणूक जिंकली; पण

पोशिंद्यांची लोकशाही / ६३