पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


स्वतंत्र भारताचे नैतिक दर्शन


 दलाचे वारे
 भारताच्याच नव्हे, सर्व जगाच्या इतिहासात एक प्रचंड बदल घडून येतो आहे. समाजवादाचा जागतिक ऐतिहासिक पराभव झाला आहे. तिसऱ्या जगातील समाजवादाचे ताबूत घेऊन, हैदोस घालणारे नामोहरम झाले आणि श्रीमंत राष्ट्रांतही अर्थव्यवस्थेतून सरकारी हस्तक्षेप संपवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. अर्थक्षेत्रातली या घटना जितक्या महत्त्वाच्या तितक्याच महत्त्वाच्या घटना राजकीय क्षेत्रातही घडत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर दोन महासत्तांचे युग आले. दोघांच्या टकरीत काही किरकोळ सत्तांचे मोठे फावले होते. समाजवादी महासत्ता कोसळली आणि काही उनाड सत्तांवर शिस्तीचा बडगा उगारला जात आहे. इराक, लिबिया, उत्तर कोरिया, इथियोपिया, हैती, रुआंडा ही ठळक उदाहरणे.
 'शहामृगी' विश्व
 या सगळ्या, उलथापालथ करणाऱ्या घटना घडल्या; तरी त्यांचा नेमका अर्थ काय याबद्दल स्पष्ट चित्र नाही. जी ती व्यक्ती किंवा संघटना, जो तो समाज आणि देश नवीन वाऱ्यापुढे थोडेसे झुकून, शक्यतो जुन्या पद्धतीनेच मार्गक्रमणा चालू ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. आर्थिक अरिष्टे आली, त्यामुळे अर्थव्यवस्थेत काही बदल अपरिहार्य झाले, बाकी सगळे काही पहिल्यासारखेच आहे अशा थाटात जग चालले आहे. शहामृगावर शत्रूचा हल्ला झाला म्हणजे तो वाळूत डोके खुपसून स्तब्ध उभा राहतो, असे म्हणतात. आपल्याला जग दिसले नाही म्हणजे जगालाही आपण दिसत नाही अशी त्याची धारणा. नवीन घटनांचा अर्थ काय, याकडे आपण दुर्लक्ष केले तर त्यांचा आपल्यावर काही परिणामच होणार नाही अशा 'शहामृगी' विश्वात वावरणे आहे.

 एकेका घटनेचा नेमका अर्थ काय, हे तपशीलवार सांगण्याची ही वेळ नाही

पोशिंद्यांची लोकशाही / ५६