पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असे दिसल्यास देश वाचवण्यासाठी खुल्या अर्थव्यवस्थेवर खरीखुरी श्रद्धा असलेला व जातीयवाद, नोकरशाही आणि भ्रष्टाचार संपवून टाकण्याचा निर्धार असलेला राजकीय पर्याय उभा करण्याचा निर्धार केला पाहिजे.
 गेल्या आठवड्यातील किंमतवाढ ही देशाला आग लागल्याच्या धोक्याची भयसूचक घंटा आहे. पंतप्रधान मुत्सद्दी असोत, राजकारणी असोत किंवा 'दोन अधिक दोन' याचेही उत्तर देण्याची टाळाटाळी करणारे 'मध्यमवर्गी' असोत, देशाचे भवितव्य त्यांच्या हाती सुरक्षित नाही. त्यांचा मध्यममार्ग म्हणजे नियंत्रण आणि खुलीव्यवस्था यांच्यातील चांगल्या गुणांचा समुच्चय नाही, त्यांचा मध्यममार्ग दोन्ही व्यवस्थांतील केवळ दुर्गुणांचा गंध आहे. पंतप्रधानांचा मध्यममार्ग स्त्री- पुरुषांच्या उत्तमोत्तम गुणांची मूर्ती-अर्धनारीनटेश्वर नाही. त्यांचा मध्यममार्ग ना - कर्त्यांचा, ना मर्दीचा, निष्क्रियतेचा 'अमंगल पंथ' आहे.

(६ फेब्रुवारी १९९४)

◆◆

पोशिंद्यांची लोकशाही / ५५