पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लोकांच्या मनास अधिक भिडणारी धर्मराष्ट्र संकल्पना भाजपने पुढे केली व त्यासाठी काँग्रेसपेक्षाही जास्त झुंडगिरी वापरण्याची तयारी केली. भाजप आणि काँग्रेस हे दोघे फॅसिस्टच. काँग्रेसला जे जमले नाही, ते वेगळ्या मार्गाने पुरे करण्यासाठी भाजप पुढे येत आहे.
 निवडणुकांचे निकाल लागतानाची परिस्थिती ही अशी आहे. सर्व पक्ष 'इंडिया'वादी. सर्व पक्ष, आवश्यक तर सर्व ताकद वापरून, सध्याची शोषणव्यवस्था चालू ठेवण्यात स्वारस्य आसलेली हीमंडळी आता जवळजवळ सारख्याच ताकदीची झाली आहे. फारसा लोकक्षोभ होऊ देणे त्यांना कोणालाच परवडण्यासारखे नाही. इंडिया आणि हिंदू राष्ट्र या दोन्ही बेगडी राष्ट्रवादांना बाजूला करून, जोतीबा फुल्यांच्या एकमय लोक या अर्थाने भारताची स्थापना करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना ही सुवर्णसंधी आहे, संधी हातात घेण्याची हिंमत त्यांनी दाखवली तर!

(२१ जून १९९१)

◆◆

पोशिंद्यांची लोकशाही / ३८