पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे, असे काही मला वाटत नाही. १९८४ मध्ये ४९ टक्के मतांवर ४१२ जागा मिळाल्या, तरी पाच वर्षांच्या आत काँग्रेसला सत्ता सोडावी लागली, राजीव गांधी हरले, काँग्रेस पक्ष हरला आणि व्ही. पी. सिंगांचे सरकार आले. त्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी कारण ठरल्या. एक म्हणजे ज्याचा खूप गाजावाजा झाला ते 'बोफोर्स' प्रकरण. राजीव गांधी हे व्यक्तिमत्त्व वेगळे होते, मनमोहन सिंह हे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे. त्यामुळे मनमोहन सिंहांच्या कारकिर्दीत बोफोर्ससारखी काही लबाडीची प्रकरणे होतील असे मला वाटत नाही.
 राजीव गांधींच्या पराभवाला कारण ठरलेली आणखी एक भयानक चूक म्हणजे 'शाह बानो' प्रकरणामध्ये एका घटस्फोटित मुस्लिम महिलेला कायदेशीरपणे जे मिळायला पाहिजे, ते मिळावे असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर घटनेत दुरुस्ती करण्याची राजीव गांधींनीही चूक केली, तेथूनच काँग्रेसच्या पराभवाला सुरवात झाली आणि मला आता असे दिसते आहे, की येत्या काही महिन्यांतच आंतकवादामुळे अशी काही परिस्थिती निर्माण होईल, की या काँग्रेसला त्यांचा 'भाई भाई' वाद पुढे चालवता येणार नाही आणि ४१२ वाले पाच वर्षांत पडले, आजचे २०६ वाले पाच महिने तरी टिकतात का नाही, याबद्दल शंका आहे.

(२१ जून २००९)

◆◆◆




पोशिंद्यांची लोकशाही / ३५१