पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





लोकसभा निवडणूक २००९
देशपातळीवरील निकालाचा अर्थ


 ००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे विश्लेषण कसे करता येईल आणि अन्वयार्थ कसा लावता येईल?
 या निवडणुकीतील मतदान होईपर्यंत सगळ्या लोकांची, सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या पत्रकारांची, प्रसारमाध्यमांची या निवडणुकीच्या निकालांबद्दल अगदी वेगळी कल्पना होती. संपूर्ण देशामध्ये राजकीय पक्षांची संख्या कधी नव्हे इतकी भरमसाट झाली आहे. त्यात पुष्कळ पक्ष प्रादेशिक आहेत, ज्यांना काही तत्त्वज्ञान नाही असेही पक्ष खूप आहेत आणि अनेक पक्ष असे आहेत, की ज्यांना अमुक एका व्यक्तीला पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसवायचे आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही एका पक्षाला किंवा कोणत्याही एका आघाडीला, सरकार बनविण्यास आवश्यक ते बहुमत मिळणे शक्य नाही आणि निवडणुकीच्या निकालानंतर बहुमताची जुळवाजुळव करून, जे काही सरकार तयार होईल ते आघाडीचेच सरकार असेल असे सगळ्या लोकांना वाटत होते. पक्ष खूप होते, आघ्याड्याही खूप होत्या आणि गंमत म्हणजे या आघाड्याही दिवसादिवसाला बदलत होत्या. कोणी काल तिसऱ्या आघाडीत होते, ते आज चौथ्या आघाडीत जात होते; काही म्हणत, की आता आम्ही काही सांगत नाही, निवडणुकीचे निकाल लागले, की ठरवू कोणत्या आघाडीत जायचे ते! अशा तऱ्हेची विस्कळित परिस्थिती असताना आणि कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळणार नाही अशी कल्पना असताना निवडणुकीचे निकाल फारच वेगळे लागले.
 आजपर्यंतच्या निवडणुकांत जिंकलेल्या पक्षांना आनंद होई आणि ते म्हणत, की इतकी मते मिळतील अशी आमची अपेक्षा होतीच. बाकीचे पक्ष आपण का हरलो याचे विवेचन करण्याचा प्रयत्न करीत. या वेळची निवडणूक अशी विशेष झाली, की यात जिंकणाऱ्यालाही मोठा आश्चर्याचा धक्का बसला. २०६

पोशिंद्यांची लोकशाही / ३४४