पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मतदानात निवडून आलेले इंदिरा काँग्रेसचे खासदार असल्याच प्रकारात मोडतात. 'जळके' बी.ए.च्या धर्तीवर त्यांना 'रडके' खासदार म्हणायला हरकत नाही.
 हा फरक राजीव गांधी यांच्याविषयी किंवा त्यांच्या कुटुंबीयांविषयी वाटणाऱ्या अनुकंपेमुळे झाला की हत्येच्या आघातामुळे काँग्रेस कार्यकर्ते खडबडून जागे झाल्यामुळे झाला की लांबलेल्या मुदतीत साधने पुरवण्याची ताकद काँग्रेसमध्येच आहे म्हणून की या तिन्ही कारणांनी झाला? आकडेवारीवरून असे दिसते, की इंदिरा काँग्रेस पक्षास मिळालेल्या मतांत स्त्रियांच्या मताचा वाटा पुरुषांच्या मतांच्या वाट्यापेक्षा जास्त आहे. यावरून अनुकंपा लाट काही प्रमाणात परिणामकारक ठरली, असा निष्कर्ष काढला तर तो वावगा ठरू नये.
 हे लक्षात घेता, उरलेल्या निकालांचा अर्थ काय? इंदिरा काँग्रसने दक्षिणेत आपले स्थान मजबूत केले आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचे एकसंध नेतृत्व मानले गेले आहे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातही काँग्रसचेच प्राबल्य आहे.
 उत्तरेतही राजस्थान, हरियाना, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांत काँग्रेसने लक्षणीय यश मिळविले आहे. उत्तर प्रदेश आणि गुजराथ येथे तर भाजपसमोर त्यांना हार खावी लागली आणि बिहारमध्ये जनता दलाने विजय मिळवला. पूर्व बंगालमध्ये मार्क्सवाद्यांनी आपले स्थान अढळ ठेवले. उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजराथ ही तीन राज्ये सोडल्यास उत्तरेतही काँग्रेसने आपले वर्चस्व बसवले आहे; पण उत्तर प्रदेश आणि बिहार ही साधीसुधी राज्ये नाहीत. एकूण खासदारांच्या संख्येपैकी एक चतुर्थांश खासदार या दोन राज्यांतूनच निवडले जातात. मंदिराचा प्रश्न शिलगावून देताना अयोध्येची निवड का झाली, द्वारकेची का नाही, याचा उलगडा निवडणुकांच्या या अंकगणितात होतो.

 भाजप आणि त्यांचे मित्र यांनी भारतीय राजकारणात प्रबळ स्थान मिळवले आहे. कदाचित् संख्येच्या दृष्टीने राष्ट्रीय मोर्चा भाजपपेक्षा वरचढ असेलही; पण राष्ट्रीय मोर्चा हा अठरा धान्यांचे कडबोळे आहे. भाजप हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे. म्हणजे काँग्रेसच्या खालोखाल देशाच्या राजकारणात आता भाजपचे स्थान तयार झाले, एवढेच नव्हे तर काँग्रेसविरोधी आघाडी बाजूला सारून, भाजपविरोधी आघाडीची भाषा सुरू झाली आहे. यावरून भाजपचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात यावे; पण भारतीय जनता पक्षास कोणकोणत्या राज्यांत यश मिळाले, हे पाहिले तर नवलच वाटते. अयोध्या उत्तर प्रदेशात आहे; पण खुद्द अयोध्या आणि अलाहाबाद येथे भाजपची डाळ शिजली नाही. त्यांचे जास्तीत

पोशिंद्यांची लोकशाही / ३४