पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३१९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर राष्ट्र मोडीत काढण्यासाठी सज्ज झालेल्यांना आपले मत देतात.
 सोनिया गांधींची राक्षसी महत्त्वाकांक्षा समजण्यासारखी आहे; मागासवर्गीय आणि मुसलमान आपली परिस्थिती सुधारण्यासाठी संपुआला पाठिंबा देतात हे समजण्यासारखे आहे; कामगारवर्ग खुलीकरण झाले, स्पर्धेचे युग आले तर आपली धडगत नाही हे समजून संपुआला पाठिंबा देतात हेही समजण्यासारखे आहे. पण, प्रत्येक शेतकरी संपुआला मत देतांना आपण स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत आहोत आणि राष्ट्रद्रोह करत आहोत असे समजत नाही यातच देशाच्या विनाशाची बीजे आहेत.

(६-२१ एप्रिल २००७)

◆◆







पोशिंद्यांची लोकशाही / ३२१