पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही. आता जर का मंदिरवाद पुढे येत असेल, तर त्याही बाबतीत आपल्याला तसेच सडेतोडपणे वागावे लागेल. पत्रकार मला विचारतात, की तुम्ही तर स्वतःला विचारवादी आणि तर्कशुद्ध मांडणी करणारे म्हणवता, मग बाळासाहेब ठाकरे जे बोलतात ते तुम्हाला पटते का? यावरून मला असे वाटते, की अशा प्रकारच्या युतीत आपलेही भले नाही आणि त्या जातीयवाद्यांचेही नुकसान आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत अशी बीजे रोवली गेली आहेत, की युतीच्या निमित्ताने आपण त्यांच्याबरोबर गेल्याने त्यांचा गावागावातील कार्यकर्ता असा विचार करू लागला आहे, की शेतकरी संघटनेच्या विचारातील स्वातंत्र्याचे बी पेरले गेल्यानंतर शिवसेनेला त्याचे अस्तित्व टिकवून ठेवणे कठीण होईल. मला भेटायला कोणीही कार्यकर्ता सहज येऊ शकतो हे पाहिल्यानंतर विदर्भातले शिवसेनेचे कार्यकर्ते मला म्हणाले, की आम्हाला बाळासाहेबांचे नखसुद्धा पाहायला मिळत नाही, त्यांच्याकडे जायचे म्हटले तरी त्यांच्याभोवती सुरक्षा सैनिकांचा गराडा असतो. तेव्हा स्वतंत्रता ही एक अशी आस आहे, अशी भूक आहे, की तिची एकदा एखाद्याला जाणीव झाली, की तो पारतंत्र्याला कधी टिकू देत नाही. आपण पार परतंत्र आहोत याची एकदा जाणीव झाली, की स्वातंत्र्य मिळायला फारसा वेळ लागत नाही. 'स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,' असे टिळकांनी म्हटल्यानंतर देश स्वतंत्र व्हायला काही फार वेळ लागला नाही. तसाच परिणाम गावागावातल्या शिवसेनेच्या अनुयायांवरही होणार आहे. त्यामुळे आपण अशा युतीमध्ये राहणे आता शिवसेनेलाही अवघड वाटत असावे.
 भाजपच्याही काही लोकांची इच्छा असावी, असा माझा अंदाज आहे, की अटलबिहारी वाजपेयींच्या काळामध्ये अर्थकारणाचा विचार मांडण्यासाठी शरद जोशी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे जे ओझे त्यांनी घेतले होते, ते आपल्या खांद्यावरून उतरले तर बरे होईल; म्हणजे आपण आपल्या पद्धतीने तोगडियांसारख्यांचे तत्त्वज्ञान बिनबोभाट पुढे मांडत जाऊ शकू. त्यामुळे त्यांचीही बरोबर राहण्याची काही फारशी इच्छा नसावी. फारकतीचा विचार आपणच करतो आहोत असे नाही, दुसऱ्या बाजूलाही एकत्र राहण्याची फारशी इच्छा राहिली आहे, असे दिसत नाही.
 भाजप हा एक ठोकळा आहे, शिवसेना हा एक ठोकळा आहे, स्वतंत्र भारत पक्ष हा एक ठोकळा आहे असे समजा. या ठोकळ्यांना सुतळीने एकत्र बांधले तर खरी एकी होत नाही. सुतळी जरा सैल झाली, की खटाखटी सुरू होते. खरी

पोशिंद्यांची लोकशाही / ३०२